
आर्वी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंशाना दिले जिवनदान…
कत्तली करीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यांना सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेऊन केली ५ गोवंशीय जनावरांची सुटका….
आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसात कत्तलीकरीता जिल्ह्यातुन चोरी होणारे गोधन तसेच जिल्ह्यातून तसेच जिल्ह्यालगतच्या सीमेवरुन होणार्या गोतस्करी संबंधाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी गुन्हे आढावा बैठकीत सर्व प्रभारिंना सदर संबंधी कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्याअनुषंगाने आज दिनांक 19 रोजी सकाळी आर्वी पोलिसांना गोपनीय खबर मिळाली की, वर्धा -आर्वी रोडने वाढोना कडून आर्वी कडे एका मालवाहू वाहनात गोवंशीय जनावरांची कत्तली करीता वाहतुक होणार आहे


अशा गोपनीयखबरे वरून पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे यांचे मार्गदर्शनाखाली डि बी पथकाचे पो.उपनि. सर्वेश बेलसरे, पो.हवा योगेश चन्ने, अमर हजारे, सागर गिरि, नापोशि अंकुश नीचत, पोशि अमोल गोरटे यांनी पंचासह आर्वी वर्धा रोडवर सावलापुर शिवार येथे तात्काळ जाऊन नाकाबंदी करून सदर मालवाहू वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यास थांबवून पाहणी केली असता वाहनाचे डाल्यात 05 गोवंशीय जनावर ज्यात 3 गाई, 1 कालवड, 1 गोरा मिळून आले असून त्यांना क्रूरतेने बांधून निदयतेने वाहतूक करताना आढळुन आल्याने त्यांची वाहतूक करणारे वाहन क्रमांक MH- 29-T- 3963 व गोवंशीय जनावर असा एकूण 3,68,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपी वाहन चालक शेख सद्दाम शेख उस्मान वय- 32 वर्षे रा. बालाजी वार्ड आर्वी तसेच मोहम्मद अबुजार अब्दुल मजीद कुरेशी वय- 22 वर्षे बालाजी वार्ड यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन आर्वी येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,आर्वी देवराव खंडेराव,पोलिस निरीक्षक ठाणेदार पोलिस स्टेशन आर्वी यशवंत सोलसे यांचे मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे पोउपनि सर्वेश बेलसरे, पो.हवा योगेश चन्ने, अमर हजारे, सागर गिरि, नापोशि अंकुश नीचत, पोशि अमोल गोरटे यांनी केली



