हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला अवैध सुगंधीत तंबाखुचा साठा…
हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकुन पकडला मोठा सुगंधीत तंबाखु व गुटख्याचा साठा…
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा नांदगांव (बोरगांव) येथे राहणारा अनिकेत गोंविंदराव चौधरी याने त्याचे मामा हनुमंत रहाटे यांचे घरी अवैद्यरित्या सुंगधित तंबाखू व गुटख्याचा साठा लपवून ठेवला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती पोलिस निरीक्षक प्रविण मुंडे यांना देवून त्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात मौजा नांदगांव येथे पोलिस पथकासह रवाना होवून नांदगांव (बोरगांव) येथे राहणारा अनिकेत गोंविंदराव चौधरी यांस ताब्यात घेवून त्याचे मामाचे घरी पोलिस पथकाचे मदतीने छापा टाकला
सदर छापा कार्यवाहीत घरझडती घेतली असता घरझडतीत १) व्हिआयपी गोल्ड कंपनीचा सुंगधित तंबाखू 500 ग्रॅम वजनांचे पॅकेट असे एका पोत्यामधे 21 पॉकीट अशा एकूण 28 पोत्यामधे 588 पॅकेट प्रती पॅकेट 250 रू प्रमाणे 1,47,000 ,२) गोल्ड कंपनीचा सुंगधित तंबाखू 500 ग्रॅम वजनांचे पॅकेट असे एका पोत्यामधे 21 पॉकीट अशा एकूण 36 चुंगडयामध्ये 756 पॅकेट प्रती पॅकेट 250 रू प्रमाणे 1,89,000/-, ३) मन गोल्ड 5 स्टॉर कंपनीचा सुंगधित तंबाखू 500 ग्रॅम वजनांचे पॅकेट असे एका पोत्यामधे 21 पॉकीट अशा एकूण 11 चुंगडयामध्ये 231 पॅकेट प्रती पॅकेट 250/- रू प्रमाणे 57,750/-. ४) माजा 108 कंपनीचा सुंगधित तंबाखू 200 ग्रॅम वजनांचे टिनाचे सिलबंद असलेले डब्बे असे एकूण 60 डब्बे प्रती डब्बा किं. 935 रू प्रमाणे 6,545. ५) प्रिमीयम राजश्री कंपनीचा सुंगधित गुटखा तंबाखू दोन बॅगमध्ये ज्यामध्ये एकूण 46 पॅकेट ( प्रत्येकी बॅग 23 पॅकेट) असलेले प्रत्येक पॅकेटमध्ये 25 लहान पुडया ज्याचा बॅच क्रमांक BPE24 असा असून प्रती पॉकेट 270 रू प्रमाणे 12,420, ६) एका कापडी थैलीमध्ये विमल कंपनीच्या सुंगधित गुटखा तंबाखूचे एकूण 60 पॉकेट प्रत्येकी पॅकेटमध्ये 30 लहान पुडया ज्याचा बॅच क्रमांक HP/05/2024 असा असून प्रती पॉकेट 120 रू प्रमाणे 7,200, ७) Black Label – 18 कंपनीच्या सुंगधित तंबाखूचे एकूण 49 पॉकेट प्रती पॉकेट 22.50 रू प्रमाण 1,102.50 पैसे,,घरासमोर रोडचे बाजुला उभी असलेली मारूती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एमएच 31 सीएन 8062 ची पाहणी केली असता ८) मारूती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एमएच 31 सीएन 8062 मध्ये रिमझिम नं. 1 कंपनीचा सुंगधित तंबाखू 1 किलो ग्रॅम वजनांची एक चुंगडीमध्ये 10 पॉकीट प्रती पॅकेट 550 रू प्रमाणे 5,550,९) मारूती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एमएच 31 सीएन 8062 मध्ये ठेवून असलेल्या ईगल हुक्का शिशा कंपनीचा सुंगधित तंबाखू 400 ग्रॅम वजनांचे पॅकेट असे दोन प्लॉस्टीकच्या लहान पोत्यामधे 20 पॉकीट प्रती पॅकेट 640 रू प्रमाणे 12,800. १०) एक जुनी वापरती गोल्डन रंगाची मारूती व्हॅगनर चारचाकी गाडी क्रमांक एम एच 31 सीएन 8062 किंमत 1,50,00/- असा एकुन किंमत 5,89,367/- रु .50 पैसे चा माल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक नूरूल हसन,.अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत,प्रविन मुंडे, पोलिस निरीक्षक, हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि भारत वर्मा, पोहवा प्रशांत ठोंबरे,नापोशि सुनिल मेंढे, राहुल साठे, पोशिआशिष नेवारे, विजय काळे, पोशी अमोल तिजारे यांनी केली. सदर गुन्हयात सुंगधित तंबाखू व गुटख्याचा साठा हा कुठून आणला याबाबत तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.