ईटेरीयर डेकोरेशन फसवनुक प्रकरणातील आरोपींचा पुणे पोलिस घेणार ताबा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

ईटेरीयर डेकोरेशनच्या नावाखाली फसवनुक करणाऱ्यांना जेलमधे  केले रवाना…

ईटेरियर डेकोरेशनच्या नावाखाली ॲानलाईन लाखोचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना वर्धा सायबर पोलिसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात…







वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी गौरव तपन चट्टोपाध्याय, रा. आलोडी, वर्धा यांनी दि (२२)डिसेंबर २०२३ रोजी त्यांचे फेसबुक वर इंटेरीयर फर्निचर डेकोरेशन ची जाहीरात पाहुन नागपुर येथील फ्लॅट करीता फर्निचर बनवायचे असल्याने त्यांनी  त्यावर दिलेल्या मोबाईल वर संपर्क केला. फिर्यादी यांना व्हॉट्स अॅप्स वर लिंक प्राप्त झाली. त्याव्दारे इंटेरीयर फर्निचर चे काम केलेल्या साईटचे काम पाहल्यानंतर फिर्यादींना त्यावर विश्वास बसला



त्यानंतर दि.(२८)फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादींचे मोबाईलवर कॉल आला. सदर मोबाईल धारकाने फर्नीचरचे कामाकरीता बुकींगचे २५,०००/- रू भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांना प्राप्त लिंक वर यु.पी.आय. व्दारे २५,०००/- रू पाठविले. दि.(४).मार्च २०२४ रोजी फिर्यादी यांना परत कॉल करून फर्नीचरचे मोजमाप करीता नागपुर येथे येत असल्याचे सांगितले. व नागपुर येथे राहुल नावाचे व्यक्तीने फिर्यादीचे फ्टलॅटवर फर्नीचर संबंधाने मोजमाप करून फर्निचरचे एकुण २,६५,९६६/- रू. होईल असे सांगितले होते. त्याअन्वये फिर्यादी यांनी दि.(०५)मार्च २०२४ रोजी २८.१९३/- रू दि. (१३). एप्रिल २४ रोजी ६६,४९१/- रू व दि. (१५).मे २०२४ रोजी ६६,४९२/- रू याप्रमाणे एकुण १,८६,१७६/- रू ऑनलाईन पाठविले.

परंतु रक्कम पाठविल्यानंतरही काम सुरू न झाल्याने फिर्यादी यांनी वारंवार कॉल केले असता कसल्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्याने फर्निचर बनवायचे नावाखाली फसवणुक झाल्याचे फिर्यादीचे निदर्शनास आल्याने नॅशनल सायबर काईम रिपोटींग पोर्टल वर तकार केल्यानंतर  २८,२१४/- रू रक्कम होल्ड झाली. याप्रमाणे एकुण १,५७,९६२/- रू फसवणुक झाल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरुन सायबर पोलिस स्टेशन, वर्धा येथे सदरचा गुन्हा नोंद करून तपास सुरु होता

सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषणावरून गुन्हयात आरोपी १) राहुल लक्ष्मण देव, वय ३१ वर्षे, कुणाल आयकोनीया, मामोर्डी पुणे, व ०२) अभिषेक यशवंत बोरडे, वय २३ वर्षे, रा. पिंपरी, सांडस, गणपती मंदीर, ता. हवेली, जि. पुणे यांना निष्पन्न करुन

दि.(२४).ॲागस्ट २०२४ रोजी गुन्हयात पुण्यातुन  अटक करून आरोपींचा दि. (२८) ॲागस्ट .२०२४ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त केला होता. त्यादरम्यान आरोपींना परत पुणे येथे नेवुन गुन्हयाचा तपास करण्यात आला. आरोपींकडुन गुन्हयात ०४ मोबाईल  किंमत १,१०,०००/- रू व नगदी १.५८,०००/- रू असा एकुण २,६८०००/- रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयात अटक दोन्ही आरोपींवर  पुणे येथील विमानतळ पोलिस स्टेशन, व वानवाडी पोलिस स्टेशन येथे फसवणुकीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती प्राप्त असुन याबाबत संबंधीत पोलिस स्टेशन यांना संपर्क करण्यात आलेला आहे.

सदर कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक. विनोद चौधरी स्थागुशा/सायबर पो.स्टे.पोउपनि शिवराज कदम, पो.स्टे. सेवाग्राम, पो.हवा.निलेश तेलरांधे, अनुप राऊत, अमित शुक्ला, वैभव क‌ट्टोजवार, रणजित जाधव, पो.शि. पवन झाडे,प्रतिक वांदीले मपोशि लेखा राठोड यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!