
घरबांधकामातील ईलेक्ट्रीकचे वायर चोरणारा रामनगर डिबी पथकाचे ताब्यात….
बांधकाम सुरु असलेल्या घरातुन ईलेक्ट्रीक वायरची चोरी करणारा रामनगर डि बी पथकाचे ताब्यात….
रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार सौ तनुजा पवन चांडक यांनी दि 21 डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिला की त्यांचे लहरी नगर येथे घराचे बांधकाम सुरु असुन तिथेच ईलेक्ट्रीक वायरींगचे काम सुरु होते त्यात ते दि 19 डिसेंबर 2024 चे दिवसा दरम्यान बांधकामाच्या घरून घरी परत आल्या व दि 21 डिसेंबर 2024 चे रोजी बांधकामाचे घरी गेले असता तिथे दि 19 ते 21 चे दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने ईलेक्ट्रीक वायर चोरुन नेले यावरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क्र 1015/2024 कलम 303(2) BNS अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला.


सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे निर्देशानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक बिपीन ईंगळे यांचे नेत्रुत्वात डिबी पथक करीत असतांना डी बी पथकास गोपनीय माहीती मिळाली की सदरचा गुन्हा हा नालवाडी येथील अभिषेक सुधाकर वाघ वय 35 वर्ष रा. देशपांडे नालवाडी वर्धा यास निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यांने मला खर्चा करिता पैशाची आवश्यकता असल्याने मी लहरी नगर येथील नवीन घराचे बांधकामावरून इलेकट्रिक वायर कापून चोरी करून, वायर जाळून त्याचे तांबे काढून विकण्याकरीता लपवून ठेवले आहे.

असे सांगितल्या वरून त्याचे ताब्यातून 1) अंदाजे 7 किलो वजनाचे तांबे चे तार किंमत 5600/- रू 2) पाण्याची मोटर किंमत 2500/- रू 3) डीजे साऊंड चे मिक्सर किंमत 15,000/- रू 4) मोटर सायकल क्र MH 32 AM 2274 कीमत 60,000/- रू असा किंमत 83,100/रू चा माल जप्तीपत्रकावर जप्त करून सदर गुन्ह्यात आरोपीस अटक केली.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर, पोलिस स्टेशन रामनगर चे ठानेदार बिपिन इंगळे, यांचे मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोहवा गिरीश चंदनखेडे, नापेशि अमोल राऊत, अमोल गीते, चेतन पापळे यांनी केली.


