
शेतमालाची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
शेत मालाची चोरी करणा-या गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी त्र्यंबक बापुराव मसराम रा. तळणी भागवत तह. देवळी यांनी त्यांचे शेतामध्ये सोयाबिन काढुन ते चुंगड्यांमध्ये भरून शेतात ठेवलेले होते, दि. 09/10/24 रोजी ते शेतात गेले असता, त्यांना सोयाबिन मिळुन न आल्याने, ते कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस स्टेशन. पुलगाव येथे चोरीबाबत रिपोर्ट दिली व, अज्ञात आरोपीविरूध्द पो.स्टे. पुलगाव येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.


सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते, दि. 10/11/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे संशईत आरोपी 1) शुभम शंकर फुगे, वय 28 वर्ष, रा. वडाळा, तह. आर्वी, जि. वर्धा 2) अंकुश विलास शेंडे, वय 30 वर्ष, रा. नाचणगाव, तह. देवळी, जि. वर्धा 3) भारत सुनिल बुरबुरे, वय 25 वर्ष, रा. तळणी भागवत, तह. देवळी 4) बादल राहुल थुल, वय 20 वर्ष, रा. तळणी भागवत, तह. देवळी 5) आदेश प्रमोद पाटिल, वय 30 वर्ष, रा. पार्डी, तह. कळंब, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले

तसेच चोरी केलेले सोयाबिन आरोपींनी कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी येथील आडत्या/दलाल यांचेकडे विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने, कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी येथुन 10 क्विंटल 25 किलो सोयाबिन, प्रती क्विंटल 3675/- रू प्रमाणे 37,668/- रू चा मुद्देमाल जप्त केला तसेच सदर गुन्ह्यातील चोरी केलेल्या मालाची वाहतुक करण्याकरीता वापरलेली महिंद्रा मॅक्सिमो मालवाहु गाडी क्र. एम.एच. 32 क्यु. 1762 कि. 3,00,000/- रू असा.कि. 3,37,668/- रू चा मुद्देमाल जप्त करून, गुन्ह्यातील आरोपीस व जप्त मुद्देमाल पो.स्टे. पुलगाव यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक. डॉ सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पोउपनि उमाकांत राठोड, पोलिस अंमलदार मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, विनोद कापसे, अभिषेक नाईक, गोविंद मुंडे, रितेश गेटमे, राहुल अधवाल, शुभम राउत सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


