वर्धा पोलिसांचे इतिहासात पहील्यांदा अवैध धंदे करणाऱ्या महिलेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पोलिस स्टेशन आष्टी हद्दीतील दारु विक्रेत्यामहीलेवर MPDA कायदयांतर्गत कारागृहात रवानगी,वर्धा पोलिसांचे आत्तापर्यंतचे कार्यवाही मधे प्रथमच एका दारु विक्रेता महिलेवर स्थानबध्दतेची कार्यवाही….

आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था तसेच शांतता राहावी यासाठी अवैध धंदे करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्यानुसार पोलिस स्टेशन आष्टी हद्दीतील कुख्यात अवैध दारु विक्रेती श्रीमती अर्चना रविंद्र सोनोने, रा. खडकपुरा, आष्टी, ता. आष्टी जि. वर्धा हिचेविरुध्द पोलिस स्टेशन आष्टी, जि. वर्धा येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अन्वये एकुण २३ गुन्हे दाखल असुन न्यायप्रविष्ठ आहेत.





सदर महीला हिचेविरुध्द वेळोवेळी प्रचलीत कायदयान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सदर महीला न जुमानता अवैधरीत्या गावठी मोहा दारुची आष्टी शहरामध्ये विक्री करीत होती. ज्यामुळे आष्टी परिसरातील सार्वजनिक स्वास्थास धोका निर्माण होवुन सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती. तसेच खडकपुरा आष्टी परिसरातील अनेक शांतताप्रीय सामान्य नागरीकांच्या सदर महीले विरुध्द अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार. ठाणेदार पोलिस स्टेशन आष्टी पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार,
यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा२०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,वर्धा श्री राहुल कर्डिले  यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने मा.जिल्हादंडाधिकारी  , वर्धा यांनी दिनांक २० मार्च २०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करण्यात आले त्यानुसार सदर महीलेस जिल्हा मध्यवर्ती कारागृह, वर्धा स्थानबध्द करण्यात आले आहे.
आगामी लोकसभा सार्वत्रीक निवडणुका लक्षात घेता लोकसभा निवडणुका निर्भीड व शांतता पुर्ण वातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर एमपिडीए कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा तसेच  पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी दिलेले आहेत. यापुर्वी सुध्दा अश्याच प्रकारची कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे..



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार, पोस्टे आष्टी,पोशि स्थापशील सफौ  संजय खल्लारकर, पोहवा  अमोल आत्राम, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस अंमलदार विष्णु काळुसे पोस्टे आष्टी यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!