अंमली पदार्थ MD सह एकास हिंगणघाट डिबी पथकाने घेतले ताब्यात,MD पावडर केले जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अंमली पदार्थ  MD ची विक्री करण्याविरूध्द हिंगणघाट डीबी पथकाची धडक कार्यवाही,एकास घेतले ताब्यात…..

हिगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थाचे सेवन करणारे तसेच त्याचा पुरवठा व विक्री करणार्याविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील पोउपनि सुनिल राम व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना खबरीकडुन खात्रीशीर खबर मिळाली की, नॅशनल हायवे क्र 44 ने जाम कडून हिंगणघाट कडे अज्जु भुसारी नावाचा इसम हा त्याचेजवळ असलेल्या मोपेड वाहनाने मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देषाने बाळगुण घेवून येत असून अज्जु भुसारी यांने गडद निळया रंगाचे शर्ट व खाकी रंगाचा फुलपॅन्ट घातलेला आहे,





अशा खात्रीशीर माहितीवरुन सदरची माहीती पोलिस निरीक्षक देवेद्र ठाकु यांना देवून त्याचे आदेशाने हनुमान मंदीर रिमडोह, सर्व्हीस रोड येथे जावून सापळा रचून नाकेबंदी करून सदर इसमांस ताब्यात घेतले असता व त्याचे नाव, पत्ता, विचारले अज्जु उर्फ मोहन प्रकाश भुसारी वय 27 वर्ष रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट जि.वर्धा असे सांगीतले. पंचासमक्ष त्याची कायदेशीर रित्या झडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये 1) एका प्लॉस्टीकच्या पन्नी मध्ये मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकुण प्लॉस्टीक पन्नीसह वजन 6.11 ग्रॅम निव्वळ मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थाचे वजन 5.70 ग्रॅम प्रती ग्रम 3500 रू प्रमाने 19,950 = 00 रू 2) प्लॉस्टीक पन्नी वजन 0.41 किंमत 00.00 3) एक नवीन वापरती टीव्हीएस कंपनीची निळसर रंगाची ज्युपीटर मोपेड वाहन क्रमांक एमएच 32 एव्ही 6074 जिचा चेसीस क्रमांक MD626 AK46P1K16154 किंमत 1,00,000/- रू 4) एक जुना वापरता निळया रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल 10,000 = 00 रू असा एकुण किंमत 1,29,950/-  रू चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपीविरूध्द एनडीपीएस अँक्ट कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.



सदरची कार्यवाही प्रभारी पोलिस अधिक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत,पोलिस निरीक्षक हिंगणघाट देवेद्र ठाकुर यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील पोउपनि सुनिल यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राजेश शेंडे, पोशि आशिष नेवारे,रोहीत साठे, मंगेश वाघमारे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश इटकल, नापोशि मोहम्मद गौरवे हिंगणघाट पोलिस करत आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!