
हिंगणघाट डी बी पथकाने MD पावडर सह एकास घेतले ताब्यात…
हिंगणघाट डी बी पथकाने अंमली पदार्थ MD पावडरसह एकास घेतले ताब्यात….
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि अनिल आळंदे हे डी बी पथकाचे अंमलदारासह पोस्टे परिसरात रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,‘ नुतन कन्या शाळा, रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथील शाळेचे ग्राउड मध्ये स्वागत यादव रा. रामनगर वार्ड, हिंगणघाट हा त्याचेजवळ मॅफेड्रान(MD) नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री करण्याचे उद्देषाने बाळगुण विक्री करीत आहे


अशा खात्रीशीर माहितीवरुन सदरची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रोशन पंडित सा. व मा. पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर सा. यांना देवून त्याचे आदेशाने नुतन कन्या शाळा हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून नुतन कन्या शाळा, हिंगणघाट येथील ग्राउड परीसरात येवुन पाहणी केली असता खबरेप्रमाणे शाळेच्या इमारतीचे पायऱ्यावर बसून एक ईसम डिझाईन चे शर्ट व निळ्या रंगाचे जीन्स पॅन्ट घालून शाळेचे पायरीवर बसून दिसुन आल्याने पंचासमक्ष सापळा रचून सदर इसमांस ताब्यात घेवून त्याचे नाव, पत्ता, विचारले असता त्याने त्याचे नाव स्वागत दुर्गाप्रसाद यादव वय 24 वर्श रा. रामनगर वार्ड, हिंगणघाट .जि. वर्धा असे सांगीतले.

पंचासमक्ष त्याची कायदेशीर रित्या अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये 1) एका प्लॅस्टीकच्या पन्नी मध्ये मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकुण ल्पॅस्टीक पन्नीसह वजन 5.89 ग्रॅम 2) विक्रीचे नगदी 2920 रू. 3) एक इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजन काटा की 1000 रू असा एकुण जुमला किंमत 27,800/- रू चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपीविरूध्द एनडीपीएस अँक्ट कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,.अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांचे निर्दशानुसार पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनी अनिल आळंदे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, विवेक वाकडे, पोशी आशिष नेवारे, विजय काळे, मंगेश वाघमारे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.


