अवैधरित्या गावठी मोहादारु गाळणार्या महिलेवर हिंगणघाट डी बी पथकाची कार्यवाही….
आगामी विधानसधा निवडनुक शांततापुर्वक पार पडावी म्हनुन जिल्ह्या पोलिस दलातर्फे सर्व पोलिस स्टेशन स्थरावर अवैधरित्या मोहादारु निर्मीती व विक्री करणाऱ्यांवर वॅाश आऊट मोहीम राबविली जातेय
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 07/11/2024 रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डिबी पथक हे विधानसभा निवडणूक संबंधाने पोलिस ठाणे परिसरात वॉश आऊट मोहीम राबवित असताना मुखबिर कडुन खबर मिळाली की, रत्नी पवार राहणार उमरी येडे पारधी बेडा हिने वनविभागच्या झूडपी जंगलामध्ये अवैदयरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरिता कच्चा मोहन रसायन सडवा लपवुन ठेवला आहे
अशा खात्रीशीर माहितीवरुन सदरची माहीती ठाणेदार पोलिस निरीक्षक मनोज गभने यांना देवून त्यांचे आदेशाने मौजा उमरी पारधीबेडा येथे पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे पारधीबेडा येथे छापा कार्यवाही केली असता सदर ठिकाणी 1) लोखंडी मोठया 09 ड्रममध्ये 1800 लिटर मोहन रसायन सडवा कीं. 126,000/- रू 2) मोठे 12 प्लास्टिक ड्रम मधे 1200 लिटर मोहन रसायन सडवा कीं 84000/-,रू 3) लोखंडी व प्लास्टिक ड्रमसाहित्य कीं.10,200/- रू असा एकूण 2,20,200/- रू चा मुद्देमाल मिळुन आला त्यास जप्ती पंचनामा प्रमाणे कार्यवाही करून सदर कच्चा मोहन रसायन सडवा व साहित्य नाश करून आरोपीस रत्नी पवार रा पारधीबेडा उमरी हीचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत, यांचे निर्देशानुसार ठाणेदार पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि आळंदे डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, विवेक वाकडे,पोशि मंगेश वाघमारे, आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली.