
ईलेक्ट्रॅानिक मशीनच्या साहाय्याने जुगार खेळणार्यावर हिंगणघाट डि बी पथकाचा छापा,साहीत्यासह जुगारी ताब्यात….
इलेक्ट्रॅानिक मशीन जुगार अड्ड्यावर हिंगणघाट डि बी पथकाचा छापा,२.७५ लाखाचे वर मुद्देमाल जप्त…
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व जिल्ह्यातील प्रभारींना आदेशीत केले की कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवुन घेतले जाणार नाही तसेच अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेशही निर्गमित केले होते त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे चे अंमलदार हे दि 15 फेब्रुवारी रोजी पोलिस ठाणे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की, हिंगणघाट येथील आठवडी बाजारातील शिव मंदिरा समोरील कॉम्प्लेक्स मधील एका दुकानात इलेक्ट्रॅानिक कॉइन मशीनवर चाबीचा वापर करून मशीनवर असलेल्या नंबरवर पैशाचा हार जितचा खेळ करून विविध आकडे वर पैसे लाऊन हार जितचा जुगार खेळत आहे.


अशा मिळालेली गोपनीय माहिती ठाणेदार पोलिस निरीक्षक मनोज गभने यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहीतीप्रमाने शिव मंदिरा समोरील गेम पार्लरवर पंच व पो स्टाफ सह छापा टाकला असता सदर ठिकाणी समीर खुशाल गायकवाड वय 28 वर्ष रा. संत विरभगतगतसिंग वॉर्ड, हिंगणघाट हा नागसेन उर्फ सुनील वनकर रा. वर्धा याचे सांगण्यावरून त्याचे मालकीच्या इलेक्ट्रॅानिक व्हिडिओ गेम पार्लर मशीन वर 1) रोशन सुरेश निमजे 2) अब्दुल जाहिद अब्दुल मतीन दोन्ही रा हिंघणघाट यांना खेळवीत असताना रंगेहात मिळून आला

यातील आरोपी समीर खुशाल गायकवाड याचे ताब्यातून 1) वेगवेगळ्या कंपनीच्या 09 इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीन कीं 2,70,000 रू. 2)09 नग रेस्टो कंपनीच्या प्लास्टिक खुर्ची की 2700 रू. 3) आरोपीतंच्या अंगझडतीत जुगार खेळाचे नगदी 3250/- रू.असा एकूण जु कीं 2,75,950 /-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिस स्टेशन हिंगनघाट येथे 04 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कामगिरी.पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत,पोलिस निरीक्षक .मनोज गभने, ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे अधिकारी सपोनि अनिल आळंदे, पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली.


