हिंगणघाट डी बी पथकाची पारधी बेड्यांवर धडक कार्यवाही…
हिगणघाट डी बी पथकाची हद्दीतील खैराटी आणि तरोडा पारधी बेड्यावर मोहादारु भट्ट्यांवर मोठी कार्यवाही,५ लाखाचेवर मुद्देमाल केला नष्ट…
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १४ रोजी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथक परिसरात पारधी बेड्यावर वॅाश आऊट मोहीम राबवित असताना खैराटी पारधी बेडा येथील मीना सुनील भोसले तसेच रंजित भुजंग पवार दोन्ही राहणार खैराटी पारधी बेडा हे त्यांच्या बेड्या जवळील नाल्या जवळ अवैधरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरिता दारूभाट्टी लाऊन मोहादारू गाळीत आहे
अशाी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहीती ठाणेदार मनोज गभने यांना देवून त्यांचे आदेशाने मौजा उमरी पारधीबेडा येथे पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे पारधीबेडा येथे रेड केला असता पहिल्या कारवाईत सौं.मीना सुनील भोसले हिच्या ताब्यातून प्लास्टिक लोखंडी मोठया ड्रम मधे 1900 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा, 200 लिटर उकळता मोहा रसायन सडवा, 90 लिटर मोहा दारू, दारूभाट्टीचे साहित्य व दारु विक्रमाचे नगदी रोख असा एकूण. 1,97,150/- रू चा मुद्देमाल मिळुन आला.
तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये रंजीत भुजंग पवार व 25 वर्ष राहणार शिवनी पारधी वेडा मुक्काम खैराटी पारधी बेडा याच्या ताब्यातून प्लास्टिक व लोखंडी ड्रम मध्ये 2000 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा, उकळता मोहा रसायन सडवा, 120 लिटर गावठी मोहा दारू, दारू भट्टीचे साहित्य, दारू विक्रीचे नगदी रोख असा एकूण जुमला किंमत 2,11,520 /- रू चा माल जप्त करण्यात आला.
तिसऱ्या कारवाईत तरोडा पारधी बेडा येथे सौ शोभिता चरण भोसले व 39 वर्ष रा तरोडा पारधी वेडा हिच्या ताब्यातून 1000 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा, दारू भट्टी करता वापरलेला 200 लिटर उकळता मोहा रसायन सडवा, 60 लिटर गावठी मोहा दारू, दारूभट्टी चे संपूर्ण साहित्य व ड्रम असा एकूण किंमत 1,06,800/- रु चा माल जप्त करण्यात आला. तिन्ही कार्यवाहीमधे एकूण 5,15,470 /- रू चा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करुन
सदर कच्चा मोहन रसायन सडवा, उकळता मोहा रसायन सडवा, दारूभट्टी चे संपूर्ण साहित्य व ड्रम, गावठी मोहा दारू नाश करून करून आरोपी1) मीना सुनील भोसले, 2)रंजीत भुजंग पवार दोन्ही रा खैराटी पारधीबेडा 3) सौ शोभिता चरण भोसले रा.तरोडा पारधीबेडा यांचे विरूध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला..
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,.अपर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांचे निर्देशानुसार पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे आदेशाने सपोनि आळंदे डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि. राहुल साठे, विवेक वाकडे,पोशि मंगेश वाघमारे,आशिष नेवारे,विजय काळे यांनी केली.