
SDPO हिंगणघाट यांचे पथकाची रेतीची चोरटी वाहतुक करणार्यावर धडक कार्यवाही….
उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणार्या विरुद्ध धडक कारवाई…
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगणघाट तालुक्यातुन वाहनारी वणा नदी व त्याची असणारी मागनी त्यामुळे त्यावर बोटी लावुन अवैधरित्या उपसा करणार्यांची व तीची चोरटी वाहतुक करणारे ही चितेची बाब आहे त्यातच यांचेवर सतत होणारी कार्यवाही यालाही हे जुमानत नाही त्याअनुषंगाने अशा रेतीची चोरटी वाहतुक करणार्यांवर कडक कार्यवाही करण्याचे उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांनी त्यांचे कार्यालयीन पथकास आदेशीत केले होते


त्यानुसार दि 12 जुन 2025 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलिस हवालदार अश्विन सुखदेवे ,नायक पोलिस शिपाई रविन्द्र घाटुर्ले, पोलिस शिपाई भारत बुटलेकर, राकेश इतवारे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की एक ट्रॅक्टर वना नदीचे पात्रातुन रेतीची चोरी करुन ती हिंगणघाट शहराकडे घेऊन येतोय त्यानुसार नाकाबंदी करुन (1) चालक निलेश महादेवराव ठाकरे ,रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट क्लिनर शेख इमरान शेख जब्बार, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट हे त्यांच्या ताब्यातील बिना क्रमांकाचा लाल रंगाच्या महिंद्रा कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये वना नदीच्या पात्राचे रेती घाटातून काळी रेती चोरून हिंगणघाट शहर कडे वाहतूक करीत असतांना आढळुन आले

यातील नमुद ट्रॅक्टर यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काळी रेती (गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास का काळी रेती (गौन खनिज ) असा एकुन कि 8,06,000/- रु चा माल मिळून आल्याने , पो स्टे. हिंगणघाट येथे नमुद आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलिस हवालदार अश्विन सुखदेवे, नायक पोलिस शिपाई रविन्द्र घाटुर्ले, पोलिस शिपाई भारत बुटलेकर, राकेश इतवारे यांनी केली.


