
बोरगाव परीसरात सुरु असलेल्या २ ॲानलाईन जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार प्रकारचे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रभारी आपआपले अधीन पथकांना सुचना देऊन कार्यवाही करण्याकरीता रवाना करण्यात आले त्यानुसार दि 27 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वर्धा शहर परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की,बोरगाव मध्ये ग्रामपंचायत परिसरात 02 ठिकाणी संगणकावर ऑनलाईन पद्धतीने आकड्यांचा जुगार सुरू आहे
अश्या मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन नमुद ठिकाणी छापा चाकला असता ग्राहक पोलिस पाहून पसार झाले,तसेच सदर ठिकाणी आरोपी 1)रवींद्र मधुकराव दरवरे वय 52 वर्ष, रा.बोरगाव मेघे, जि. वर्धा, 2)मनोहर भैयालाल चंदनमाथे वय 62 वर्ष, रा.बोरगाव मेघे, जि. वर्धा हे मिळून आले, त्यांना ऑनलाईन जुगारबाबत विचारणा केली असता त्यांनी साथीदार 3) सतीश सरपटे पाटील रा. शेगाव (पसार).4) राजू वाहने रा. अमरावती (पसार, 5) पिंटू ठाकूर रा. शेगाव (पसार), यांचेसह दोन्ही ठिकाणी संगणमताने गोल्डन व राजश्री या नावाच्या ॲप वर ऑनलाईन आकड्यांचा जुगार लावून लोकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून स्वतःचे फायदा करिता आकड्यांचा ऑनलाईन जुगार संगणकावर खेळवतो अशी माहिती दिली


सदर ठिकाणावरुन त्यांचे ताब्यातून दोन्ही जागेवरून 1) 03 संगणक, 2) 03 प्रिंटर, 3) 03 स्कॅनर , 4) 03 की बोर्ड, 5) 02 सीसीटीव्ही DVR, 6) 02 इंटरनेट राऊटर, 7) लॉटरी च्या चिठ्ठ्या व कागदाचे रोल, 8) खुर्च्या 9) टेबल, 10) स्टूल,11) 03 माऊस 12) नगदी 12,890 रुपये असा एकूण 1,46,890 रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच ऑनलाइन जुगार मालक यांना परवाना बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही शासकीय परवाना नाही असे सांगितले. त्यावरून सदर ऑनलाइन जुगार खेळणारे इसमाविरुद्ध पो स्टे वर्धा येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पो उप नि बालाजी लालपालवाले, अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, सचिन इंगोले, शेखर डोंगरे, प्रमोद पिसे, भुषण निघोट रितेश शर्मा,पोशि अमोल नगराळे, सुगम चौधरी, विकास मुंढे, गोपाल बावनकर, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



