
अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कार्यवाही,१० लाखाचेवर मुद्देमाल जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अवैध दारु विक्रेते यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी प्रत्येक प्रभारींना दिले होते त्याअनुषंगाने दि 12/11/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे चे पथक पोलिस स्टेशन सेवाग्राम परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना गोपनीय माहीती मिळाली की नागपुर ते वर्धा महामार्गावरुन विदेशी दारुची वाहतुक होणार आहे


त्यानुसार मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे बायपास रोडवर वरील मॉं कि रसोई रेस्टॉरंट जवळ सापळा रचला असता एक पांढर्या रंगाची MARUTI RITZ ZXI BS IV. कार क्र. MH-19/AX-4672 येतांना दिसली मिळालेल्या माहीतीवरुन सदरच्या कारच्या नंबरची शहानिशा करुन त्यास थांबवुन त्याच्या कारची तपासनी केली असता कारमध्ये एकुण 20 खरर्ड्याचे खोक्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा माल मिळुन आल्याने आरोपी कार चालकास विचारपुस केली असता, सदर दारूचा माल हा त्याने वडगाव जिल्हा नागपुर ग्रा. येथील साकी बार मधुन अवैधरित्या खरेदी केल्याचे सांगितल्याने,

यावरुन जागीच पंचनामा कार्यवाही करून कार चालकाचे ताब्यातुन 1) एक पांढ-या रंगाची MARUTI RITZ ZXI BS IV. कार क्र. MH-19/AX-4672, कि. 7,50,000/- रू .2) 16 खरर्ड्याचे खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या 756 सिलबंद शिशा कि. 2,42,100/- रू, 3) 3 खरर्ड्याचे खोक्यात 72 सिलबंद बिअरचे डब्बे कि 25,200/- रू, 4) 01 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या 100 सिलबंद शिशा कि. 10,000/- रू व एक कि-पॅड मोबाईल कि. 2,000/- रू असा एकुन कि. 10,29,300/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, आरोपी 1) रवि दिलीप देशमुख, वय 36 वर्ष, रा. गौरी नगर सांवगी मेघे वर्धा, 2) वडगाव जिल्हा नागपुर ग्रा. येथील साकी बार चा मालक/चालक यांचेवर पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पोउपनि. प्रकाश लसुंते पोहवा मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, पोशि गजानन दरणे, रवि पुरोहित, विनोद कापसे, अभिषेक नाईक, मुकेश ढोके यांनी केली.


