
स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत १ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात….
स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ गांजा विक्रेत्या विरुद्ध धडक कारवाई, दोन गुन्ह्यात 2,36,400/- रुपये चा माल जप्त…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारिंना देण्यात आले होते त्यानुसार दि 18 जुन 2025 रोजी स्था.गु.शा.पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून शिवनगर ते हमदापुर रोडवर सापळा रचुन आरोपी हरिष व्यंकटराव मोहिते, रा. शिवनगर तह. सेलु हा पोलिसांची चाहुल लागताचं, त्याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल जागीच सोडुन पळुन पसार झाला.


त्याचा साथीदार मनीष गणेश मोहिते वय 30 वर्ष रा. शिवनगर तह. सेलु यास ताब्यात घेवुन, त्याची व मोटर सायकलची झडती घेतली असता, झडती दरम्यान एका कापडी पिशवीमध्ये निव्वळ 1 किलो 62 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा कि. 21,240/- रू. व एक लाल रंगाची बुलेट मोटर सायकल क्रमांक AP-30/AA-5899 कि. 2,00,000 रू असा जु.कि. 2,21,240 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. दहेगाव येथे अप क्र. 165/25 कलम 88(क), 20(ब), ii(अ), 29 एन.डी.पि.एस ॲॅक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, जप्त मुद्देमाल व आरोपीस पो.स्टे. दहेगाव यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत.
तसेच पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या दुसर्या पथकास मिळालेल्या खबरेवर सिद्धार्थ नगर वर्धा येथे राहणारा अमित ऊर्फ जॉन हरिभाऊ उके याचे राहते घरी गांजा बाबत रेड केला असता त्याचे घर झडतीमध्ये 758 ग्राम गांजा की.15160/- चा मिळुन आल्याने सदर आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी पो.उपनि. उमाकांत राठोड,पोहवा अरविंद येनुरकर, हमीद शेख, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, अमर लाखे, अमर पाटील, रोशन निबोंळकर, श्रीकांत खडसे, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, विनोद कापसे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



