स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला ७० लाखाचा गुटखा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) हद्दीत समृध्दी महामार्गावरुन दिल्ली ते मुंबई येथे सुगंधित तंबाखुची वाहतुक करणारा कंटेनर पकडुन ७० लाखाच्या गुटख्यासह १,००,०६,५००/- रू.चा मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की  अशोक लिलँड कंपनीचा कंटेनर क्र आर.जे. ५२ जि.ए. ५६७० मधुन प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची दिल्ली येथुन सिंदी (रेल्वे) मार्ग मुंबई येथे समृध्दी महामार्गाने वाहतुक होत आहे





अशा गोपनीय माहीती प्राप्त झाल्यावरून पंचा समक्ष पो. स्टाफ चे मदतीने समृद्धी महामार्गावर कंटेनर थांबवुन सदर कंटेनर पो.स्टे सिंदी (रेल्वे) येथे नेवुन कंटेनर चालक क. १) शाहीद ईलीयास, वय ३२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता. जि. नुह (मेवात), रा. हरियाणा २) हाकमखॉन शाकिरखॉन वय २२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा यांना ताब्यात घेउन कंटेनर मधील मालाबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदर कंटेनरमधील माल हा दिपक ट्रान्सपोर्ट चे मालक व विकास छाबडा दोन्ही रा. दिल्ली यांचे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष पोस्टाफचे मदतीने कंटेनरची पाहणी केली असता सदर कंटेनरमध्ये ईतर साहीत्साचे मधे लपऊन ठेवलेला ०१) सुपर कॅश गोल्ड कंपनीचा सुगंधित तंबाखु वनज ५१०३ कि.ग्रॅ. २) सिग्नेचर कंपनीचा सुगंधित पान मसाला वजन ११०१ कि.ग्रॅ. ३) व्ही.सी. ५ कंपनिचा सुगंधित तंबाखु वजन ८५० कि.ग्रॅ. असा प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु किंमत ७०,०६,५००/- रू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले कंटेनर किमंत ३०,००,०००/- रू. असा एकुण.कि. १,००,०६,५००/- रू.चा मुद्देमाल मिळुन आला



सदरचा माल गुन्हयाचे पुराव्याकामी ताब्यात घेवून आरोपी क्र. १) शाहीद ईलीयास, वय ३२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा २) हाकमखाँन शाकिरखॉन वय २२ वर्षे, रा. मु.पो. अडवर, ता.जि. नुह (मेवात), रा. हरियाणा ०३) दिपक ट्रान्सपोर्ट चे मालक ४) विकास छाबडा दोन्ही रा. दिल्ली ५) वाहन मालक अशिना विकास छाबडा रा. दिल्ली यांचे विरूध्द पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथे कलम १२३, २७४, २७५, २२३, भा.न्या.सं. सह कलम २६(१), २६(२) (iv), २७ (३) (९), ३०(२) (a), ३(१) (zz) (iv), ५९ अंन्नसुरक्षा व मानके कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि  राहुल ईटेकार, बालाजी लालपालवाले व पोलिस अंमलदार नरेन्द्र पाराशर, मनिष श्रीवास, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अमोल नगराळे, नितीन ईटकरे, गोपाल बावणकर, सागर भोसले, मंगेश आदे, दिपक साठे, मिथुन जिचकार, प्रफुल पुनवटकर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!