अवैधरित्या मोहा दारु गाळणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात…
अवैद्यरीत्या गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहादारु गाळनारा पुलगाव पोलीसांच्या ताब्यात…
पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध मोहादारु गाळणारे यांचे विरोधात जणू मोर्चाच उघडला की काय हे मागील काही दिवसात होणार्या सततच्या कार्यवाहीतुन दिसुन येतय याचाच एक भाग म्हनुन काल दुपारचे सुमारास पोलिस उपनिरीक्षक सदानंद वानखेडे हे पोलिस स्टेशन पुलगाव येथे दैनंदिन कार्य करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की मौजा सालफड शिवारात एक ईसम गावठी दारुची मोहादारुची निर्मीती करतो आहे
अशी गोपनीय बातमी मिळाल्याने सदरची बातमी ही प्रभारी पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांना देऊन सदर ठिकाणी दुपारचे २.३० वा चे सुमारास मौजा सालफड येथील जयवंत ठाकरे यांचे शेताजवळी डाबरीचा नाला येथे प्रो रेड छापा टाकला असता त्याठिकाणी प्रफुल चिध्रुजी मारबते वय 41 वर्ष रा.सालफळ ता.आर्वी जि.वर्धा हा हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत असताना मिळुन आला
त्यांस ताब्यात घेवुन घटनास्थळावरुन 1) दोन मोठा लोखंडी भट्टीच्या ड्रम ज्यामध्ये 150 लिटर प्रमाणे 300 लिटर गरम उकळता मोहा सडवा प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 30000/- रु. 2) दोन लोखंडी मोठे ड्रम प्रती ड्रम 800/- रु.प्रमाणे किमंत 1600/- रु. 3) दोन जर्मनचे घमीले प्रती घमेले 500/-रु. प्रमाणे किमंत 1000/- 4) दोन लोखंडी ड्रम व एक प्लास्टीक ड्रममध्ये प्रती ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे 600 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 60000/- रु. 5) दोन लोखंडी मोठे ड्रम व एक प्लास्टीक ड्रम प्रति ड्रम 800/- रु. प्रमाणे 2400/- रु. 6) दोन प्लास्टीक डबकीमध्ये प्रती डबकी 20 लिटर प्रमाणे 40 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 150/-रु. प्रमाणे 6000/-रु. 7) दोन प्लास्टीक डबकी प्रति डबकी 200/-रु. प्रमाणे किमंत 400/- रु. 8) भट्टी साहीत्य 2000/- रु. असा एकुण जुमला किमंत 103400/- रु.चा मौका जप्ती पंचनामा कारवाई प्रमाणे पंचासमक्ष जप्त करुन आरोपीतांविरुध्द कलम 65 (ब),(सी),(ई),(फ) म.दा.का अन्वये गुन्हा नोंद केला.असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुन चव्हान यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक सार्थक नेहते,पोलिस निरीक्षक व ठाणेदार राहुल सोनवणे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोउपनि सदानंद वडतकर,पोशि मोहम्मद गौरवे,ओमप्रकाश तल्लारी,विश्वजीत वानखेडे यांनी केली आहे.