
सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन सावंगी मेघे पोलिसांनी उघड केले तीन गुन्हे….
सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन सावंगी मेघे पोलिसांनी उघड केले मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघड….
सावंगी मेघे(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 21.जानेवारी रोजी फिर्यादी आशिष बाबाराव ढोणे रा. सावंगी मेघे यांनी सावंगी मेघे दवाखान्याचे गेट क्र. 3 जवळील त्यांचे कॅफे समोर त्यांचे मालकीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एम. एच 32 एए 0137 ही ठेवली होती ती कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली अशा फिर्यादी यांचे तोडी रिपोर्टवरून पो.स्टे सावंगी येथे अप. क. 0024 / 2025 कलम 303 ( 2 ) भा. न्या. सं. नोंद करण्यात आला होता व तपास सुरु होता


त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील डी बी पथकाला मुखवीरकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, एक इसम सावंगी ते सालोड रोडवरील सैनी हॉटेलजवळ गुन्हयातील चोरीस गेलेली मोपेड गाडी घेवून उभा आहे अशा मिळालेल्या माहितीवरून नमुद ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेवून त्याची सखोल चौकशी केली असता त्याचेकडून पो.स्टे. सावंगी मेघे येथील गुन्हयात
चोरीस गेलेली 1) अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एम. एच 32 एए 0137 किं. 15,000 / रू. ची जप्त करण्यात आली.

तसेच त्याची अजुन कसुन विचारपुस करून त्याचे ताब्यातून गुन्हया व्यतीरीक्त पो.स्टे. सावंगी मेघे परीसरातून चोरलेली 2) मोपेड गाडी क्र. एमएच 32 वाय 3326 किं. 70,000 / रू. व 3) प्लेजर मोपेड क्र एम एच 32 ए. एन 7355 किं. 55,000/ रू. 4) होंडा डिओ मोपेड क्र एम.एच 31 डी.एच 3383 किं. 70,000/ रू. 5) सुझुकी ऐसेस क्र. एमएच 31 डी. क्यु 9739 किं. 60,000/ रू. 6) अॅक्टीव्हा मोपेड क. एम. एच 32 ए.टी 4411 किं. 75,000/ रू. एकुण किं. 3,45,000 / रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी जवळ ईतर गाड्यांच्या भरपुर चाब्या मिळून आल्या असून त्या जप्त केल्या आहेत

नमुद जप्त अॅक्टीव्हा मोपेड गाडी 1 ) गाडी क्र. एम.एच 32 एए 0137 ही गाडी पो.स्टे सावंगी गुन्हा क्र अप.क. 0024/2025 कलम 303 (2) भा.न्या. सं. मधील असून 2) मोपेड गाडी क्र. एमएच 32 वाय 3326 ही गाडी पो.स्टे. हिंगणघाट येथील अप.क्र. 121 / 25 कलम 303 (2) भा.न्या.सं. अन्वये चे गुन्हयातील आहे. तसेच 3) प्लेजर मोपेड क्र. एमएच 32 ए. एन 7355 व 6) अॅक्टीव्हा मोपेड क्र. एम.एच 32 ए. टी 4411 या गाड्यांचे मालकांचा शोध घेण्यात आला. गाडीचे मालक वैद्यकीय शिक्षण घेत असून बाहेरगावी आहे.त्यामुळे त्यांनी तक्रार दिलेली नाही. तसेच उर्वरीत दोन वाहने 4) होंडा डिओ मोपेड क्र. एम.एच 31 डी.एच 3383 व 5) सुझुकी ऐसेस क्र. एमएच 31 डी. क्यु 9739 यांचे मालकांचा शोध घेणे सुरू आहे. गुन्याचा तपास सुरु आहे. आरोपीकडून आणखी गाड्या मिळून येण्याची दाट शक्यता असल्याने त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येतोय
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेष्वर यांचे मार्गदर्शनात सहा. पोलिस निरीक्षक संदिप कापडे ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे डि बी पथकातील पो.हवा सतिश दरवरे, संजय पंचभाई, अनिल वैद्य, निलेश सडमाके,पोशि निखील फुटाणे, अमोल जाधव यांनी केली, पुढील तपास पोहवा संजय पंचभाई हे करीत आहे.


