
अट्टल दारुविक्रेता हरदिलसिंग याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,तळेगाव पोलिसांची पहिलीच कार्यवाही…
तळेगांव (शा.पंत) येथील सराईत अवैध दारू विक्रेता अमरावती कारागृहात स्थानबद्ध पोस्टे तळेगांव (शा.पंत) येथील MPDA ची पहीलीच कारवाई….
तळेगाव(शा.पंत)वर्धा – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असुनही जिल्हयात लपुनछपुन अवैध दारू विक्री चे प्रमाण अधिक असल्याने अवैध दारू विक्री करणा-यांवर परीणामकारक प्रतीबंध व्हावा या उद्देशाने त्यांचेवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे प्राप्त आदेश व निर्देशानुसार काकडधरा, तळेगांव येथील सराईत अवैध दारू विक्रेता हरदिलसिंग टेलसिंग अंधेले, वय 47 वर्ष याचेवर सन 2013 पासुन दारु बंदी कायद्याअंतर्गत भरपुर गुन्हे दाखल असल्याने तसेच त्याचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करुनही त्याचे वर्तनुकीत कोणत्याही प्रकारे सुधारणा झाला नाही


तसेच त्याने कायद्याविषयी भिती न बाळगता अवैध दारु विक्री सुरुच ठेवली होती त्यामुळे त्याचे विरुध्द ठाणेदार, तळेगांव (शा.पंत) यांनी एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करून पोलिस अधिक्षक वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी सा. वर्धा यांना सादर केला असता सदर प्रस्तावाची दखल घेवुन मा जिल्हाधिकारी सा वर्धा यांनी दिनांक 28/01/2025 रोजी नमुद सराईत दारुविक्रेत्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केले त्यानुसार सदर स्थानबध्द ईसम हरदिलसिंग टेलसिंग अंधेले. यास दिनांक 29/01/2025 रोजी अमरावती येथील कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

विशेष म्हनजे सदरची कार्यवाही ही पोलिस स्टेशन तळेगाव शापंत येथील पहिलीच कार्यवाही असुन यापुढे अशाच प्रकारची कठोर कार्यवाही सुरु ठेवुन सराईत दारु विक्रेत्यांवर एम.पी.डी.ए. अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही हि पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिक्षक आर्वी देवराव खंडेराव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी स्थागुशा वर्धा, सपोनि मंगेश भोयर ठाणेदार तळेगाव शापं, सपोनि पंकज वाघोडे, पोहवा आशिष गौरी, पोहवा अमोल अत्राम, पोहवा रोशन निंबाळकर स्थागुशा वर्धा पोशि बालाजी म्हस्के, पोशि अनिल ढाकणे पो स्टे तळेगाव शापं यांनी यशस्विरित्या पार पाडली.


