वर्धा रामनगर हद्दीतील कुख्यात दारु तस्कर आकाश उर्फ चकन यांचेवर वर्धा पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील अवैध दारु विक्रेता आकाश उर्फ चकन हा एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर कारागृह येथे एका वर्षाकरीता स्थानबध्द….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्या विरुध्द विशेष मोहीम राबवून त्यात दारुची अवैध वाहतुक करणारे,विकणारे तसेच गाळणारे त्याचप्रमाणे नजीकच्या जिल्ह्यातून दारुचा पुरवठा करणाऱ्यांवर  कडक कार्यवाहीचा बडगा उभारताच सर्व अवैध धंदे करणारे सैरभैर झालेत तरीसुध्दा काही लोक कुठलाही धाक न बाळगता या सर्व कार्यवाहीला पडताळून फासतांना दिसताय





यानुसारच पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील अवैद्य दारु विक्रेता आकाश उर्फ चकण उर्फ गोलु अजय मोटघरे, वय ३० वर्ष, रा. सर्कस ग्राऊंड जवळ, रामनगर, वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर, सेवाग्राम, खरांगणा चे अभिलेखावर सन २०१८ पासुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अवैधरीत्या दारुची मोठ्या
प्रमाणात बाहेर जिल्ह्यातुन तस्करी करुन तिचा पुरवठा करण्याचे एकुण २१ गुन्हे नोंद आहे. तसेच सदर ईसमा विरुध्द कलम ११० (ई) फौजदारी संहिता अन्वये प्रतिबंधक कार्यवाही केली असता
त्याने नमुद प्रतिबंधक कार्यवाहीचे उल्लंघन करुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये २ गुन्हे केलेले आहेत.



आकाश उर्फ चकण उर्फ गोलु अजय मोटघर याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन रामनगर, सेवाग्राम व खरांगणा अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने
याचेविरुध्द ठाणेदार रामनगर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ ( सुधारणा २०१५ ) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव
पोलिस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी सादर केला होता.



सदरहु प्रस्तावाची मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी गांर्भीयाने दखल
घेवुन अवैध दारु विक्रेता आकाश उर्फ चकण उर्फ गोलु अजय मोटघरे, वय ३० वर्ष, रा. सर्कस ग्राऊंड जवळ, रामनगर, वर्धा याचा दिनांक १०.०७.२०२४ रोजी स्थानबध्द करण्याचे आदेश जारी केल्याने त्यास नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच भविष्यात वर्धा जिल्ह्यातील
शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते, रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीचे लोकांविरुध्द उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे पुनःश्च संकेत मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलिस अधिक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्था. गु.शा. वर्धा, पोलिस निरीक्षक संजय मेंढे पो.स्टे. रामनगर, सफौ. संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, पोहवा. अमोल आत्राम सर्व नेमणुक स्था. गु.शा. वर्धा, व पोउपनि दिनेश कांबळे, पोहवा. गजाजन इवनाथे पोलिस स्टेशन रामनगर यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!