
वर्धा पोलिसांची केळझर येथील दारुविक्रेता राजेंद्रसिंग बावरी याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानब्दतेची कार्यवाही….
केळझर येथील अवैध हातभट्टी दारु विक्रेता राजेंद्रसिंग बावरी याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांची अवैध दारु विक्रेते/निर्माते यांचेविरोधात धडक मोहीम…..
वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अवैधरित्या हातभट्टी मोहादारु विक्रेत्याविरोधात धडक मोहीमच हातात घेतल्याचे दिसते कारण हे आरोपी वारंवार कार्यवाही करुन सुध्दा कशालाही न जुमानता आपले धंदे सुरुच ठेवतात त्यामुळे त्यांच्या अवैध क्रुतींवर आळा बसावा याकरीता म्हनुन त्यांचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही करण्यासंबंधी प्रस्ताव पाठविण्याचे सर्व प्रभारींना सुचना देण्यात आल्या होत्या


त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सेलु, अंतर्गत मौजा केळझर परिसरात अवैधरित्या हातभट्टीची गावटी मोहा फुला पासुन निर्मीत दारुची विक्री करणारा इसम राजेन्द्रसिंग छोटुसिंग बावरी, वय ५५ वर्ष रा. केळझर ता. सेलू जि. वर्धा याचे विरुध्द पोलिस स्टेशन सेलु, जि. वर्धा येथे सन २००९ ते २०२४ पावेतो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत एकुण १९ गुन्हे दाखल आहेत. सदर इसमा विरुध्द वेळोवेळी प्रचलीत कायदयान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस तो जुमानता नव्हता तसेच आपला अवैधरीत्या गावठी मोहा फुलाच्या हातभट्टीच्या तसेच देशी दारुची विक्री करीत होता. ज्यामुळे पोलिस स्टेशन, सेलु अंतर्गत येत असलेल्या केळझर परिसरातील सार्वजनिक स्वास्थास धोका निर्माण होवुन सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती.

तसेच पोलिस स्टेशन, सेलु परिक्षेत्रातील केळझर तसेच आजुबाजुचे खेडे गावातील मोठ्या प्रमाणात मद्दपी लोकांचा जनसामान्यांना तसेच महीला व मुलींना खुप त्रास वाढत चालला होता त्यामुळे ठाणेदार पोलिस स्टेशन सेलु पोलिस निरीक्षक देवेन्द्र ठाकुर, यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे मार्फतीने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी. यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी स्थानबध्दतेचा आदेश जारी करुन त्यास अमरावती मध्यवर्ती कारागृहात, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

तसेच आगामी येणारे सण उत्सव निर्भीड व शांतता पुर्ण वातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कटोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी., तसेच मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. अनुराग जैन, यांनी दिलेले आहेत.
सन २०२४ साली आज पावेतो एकुण १९ दारु विक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत जेल मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२५ मध्ये अद्याप पावेतो ०४ अवैध दारु विक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तीची जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.मा. जिल्हाधिकारी, वर्चा व मा. पोलिस अधीक्षक, वर्धा यांचे वेधडक मोहीमेमुळे अवैध दारु विक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक, डॉ. सागर रतनकुमार कवडे, उप विभागीय पोलिस अधिकारी, वर्धा,प्रमोद मकेश्वर,पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी पंकज वाघोडे, पोहवा अमोल आत्राम, पोहवा आशिष महेशगौरी, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, वरीष्ठ पोलिस निरीक्षक देवेन्द्र ठाकुर, पोहवा गणेश राऊत,जावेद धामीया,पोशि ज्ञानदेव वनवे,पोलिस स्टेशन, सेलु यांनी केली आहे.


