अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करुन केली  धडक कारवाई, विदेशी दारू व चार चाकी वाहनासह ३,८७,६००/- रू चा मुद्देमाल केला जप्त….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१५) ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सेवाग्राम पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम अवैधरित्या देशी विदेशी दारुचा साठा घेऊन चारचाकी वाहनाने येणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय खात्रीशीर माहीतीवरुन चितोडा परीसरात नाकाबंदी केली असता एक वाहन येतांना दिसले त्यास थांबवुन त्यातील चालकास ताब्यात घेऊन त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रणधिर चंद्रबल गौतम, वय ५३ वर्ष, रा. चिंतोडा, वर्धा असे सांगितले





त्याचे ताब्यातील वाहनाची पाहणी केली. त्याचे वाहनात वेगवेगळया कंम्पनिच्या विदेशी दारू व बिअर ने भरलेल्या लहान मोठया शिश्या मिळुन आल्याने त्याबाबत त्यास विचारपुस केली असता त्याने सदर विदेशी दारूचा माल आरोपी कमांक २) साकी बारचा चालक रा. वडगाव जि. नागपुर याचे कडुन विकी करण्या करीता आणल्याचे त्यांने सागीतल्याने आरोपीचे ताब्यातुन १) दोन खडर्याचे खोक्यात ऑफीसर चॉईस कंम्पनीच्या १८० एमएलच्या ९६ शिशा किंमत २८,८००/-रु, २) एका खडर्याचे खोक्यात ऑफीसर चॉईस ब्लु कंपनीच्या १८० एमएलच्या २४ शिशा किंमत ८,४००/-रु, ३) दोन खडर्याचे खोक्यात रॉश्ल स्टॅग कंम्पनीच्या १८० एम.एल.च्या ७२ शिशा किंमत २५,२००/-रु, ४) एका खडर्याचे खोक्यात मॅक्डॉल नंबर १ कंम्पनीच्या १८० एम.एल.च्या ४८ शिशा किंमत १६,८००/-रु, ५) एका खडर्याचे खोक्यात टुबर्ग कंम्पनीच्या ५०० एम.एल.च्या १२ सिलंबद बिअरचे कॅन किंमत ४,२००/-रु, ६) एका खडर्याचे खोक्यात कासबर्ग कंम्पनीच्या ५०० एम.एल.च्या १२ सिलंबद बिअरचे कॅन किंमत ४,२००/-रु, व ७) मारोती सूझुकी कंम्पनिची वॅगनार कार क्रमांक एम.एच. ३१ सि.एन. ६४८२ किंमत ३,००,०००/- रु असा एकुण जु. किं. ३,८७,६००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



नमुद आरोपी व साकी बारचा चालक रा. वडगाव जि. नागपुर यांचे विरूध्द पो.स्टे. सेवाग्राम येथे अप कमांक ६२८/२०२४ कलम ६५ (अ) (ई), ७७ (अ), ८३ म.दा.का. सह कलम ३(१)१८१, १३०/१७७ मो.वा. का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही. पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा विनोद चौधरी, यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी अमोल लगड, पो हवा हमीद शेख, शेखर डोंगरे, चंद्रकांत बुरंगे, सचिन ईगोले, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, नापोशि पवन पन्नासे, रामकिसन ईप्पर, मनिष कांबळे, प्रदिप वाघ, अमोल नगराळे, अरविंद ईगोले, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!