SDPO पुलगाव यांचे पथकाचा जुगारावर छापा….
उपविभागिय अधिकारी पुलगाव यांचे पथकाचा जुगारावर छापा,६ जुगारींना घेतले ताब्यात….
पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथक हे पोलिस ठाणे पुलगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापी टाकून 52 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुलगाव पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी, चोरी, अवैध धंदे यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी दिले होते. याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव यांचे पथक हे कारवाईसाठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पाटणी कॉलेज जवळ, जुना पुलगांव, येथील सार्वजनिक ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 52 तास पत्याचा पैश्याचे हारजितीचा खेळ खेळतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन एकुण 52,860/- रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला
तसेच सदर ठिकाणावरुन जुगार खेळत असलेले आरोपी 1) रोहीत रविंद्र केळवतकर, वय (23 वर्षे), 2)चेतन राकेश पटेल, (वय 24 वर्षे), 3) जयप्रकाश ओमप्रकाश भंडारकर, (वय 27 वर्षे), 4) नरेश बाबाराव खंडागळे, (वय 42 वर्षे), 5) रितेश सुरेशराव मडावी, (वय 32 वर्षे), 6) निखील रूपरावजी वाघाडे, (वय 26 वर्षे), सर्व रा.जुना पुलगांव, ता.देवळी जि.वर्धा यांच्यावर 918/2024 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे.
सदरची कारवाई हि पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात पथकातील पोहवा. लोभेश गाडवे,योगेश देहारे, पोशि संदीप बोरबन गितेश देवघरे यांनी केली आहे.