रामनगर डि बी पथकाने दोन दिवसात लावला घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा.आरोपी ताब्यात…
घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिस स्टेशन रामनगर येथील डिबी पथकाने २ दिवसात लावला छडा,एका विधिसंघर्षित बालकास मुद्देमालासह घेतले ताब्यात….
रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी पुंडलिक विठोबाजी डेकाटे, रा. यशवंत डि.एड. कॉलेज जवळ कोल्हे ले-आउट रामनगर वर्धा हे परीवारा सह दि २४.डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०८.३० वा. दरम्याण घराचे मेन गेट ला व कंपाउंडचे गेट ला कुलूप लावुन मित्राच्या मुलाच्या लग्नाकरीता जि. नागपुर येथे गेले व दि २५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वा लग्न कार्यक्रम आटोपुन घरी आले असता कंपाउंडचे गेट चे कुलूप उघडुन घराचे दाराजवळ गेले असता घराचे दाराचे कुलुप सुध्दा तुटलेल्या स्थितीत दिसले
त्यानंतर घरातील सामानाची पाहणी केली असता घरातील हॉलमध्ये असलेला १) vu कंपनिचा १२७ cm (५०) Full HD LED किंमत अंदाजे २०,०००/- रु, तसेच बेडरुम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे ड्राव्हर मधील २) चांदीचे पुजेचे व हळदी कुंकाचे भांडे अंदाजे किं. ५०००/- रु.,३) भारतीय चलनाच्या २० रु व ५० रु दराच्या नोटा किं. १२००/- रु च्या असा एकुण किं.२६,२००/- रु च्या दिसुन आले नाही. सदर TV. चांदीच्या वस्तु व नगदी रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले अशा फिर्यादीने पोस्टे रामनगर ला येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र १०२०/२०२४ कलम ३३१(३),३३१ (४), ३०५० BNS गुन्हा नोंद करण्यात आला
सदर गुन्हयातील तपासात खबरीमार्फत खात्रीशीर गोपनीय माहीती वरून व सी.सी. टी.व्ही फुटेज ची पाहणी करून आरोपींची चेहरे पट्टट्टी तसेच गुन्हयात वापरलेल्या मोटारसायकलचे वर्णनाप्रमाणे सदर गुन्हयात एका विधीसंघर्षित बालकास निष्पन्न करुन त्यास गुन्हयात विचारपुस करुन यांचे कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेली १) vu कंपनिची 127 cm (५०) Full HD LED किंमत अंदाजे २०,०००/- रु, तसेच बेडरुम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे ड्राव्हर मधील २) चांदीचे पुजेचे व हळदी कुंकाचे भांडे अंदाजे किं. ५०००/- रु., व तसेच गुन्हयात वापरलेली होंण्डा कंपनीची शाइन काळया रंगाची मोटर सायकल MH31DX8982 अंदाजे किंमत ४०,०००/- रू.असा एकुण किमत ६५,०००/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला
सदर कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मक्केश्वर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक बिपीन इंगळे यांचे निर्देशाप्रमाणे डी बी पथकाचे प्रमुख श्रेणी पोउपनि दिनेश कांबळे, अजय अनंतवार, गजानन मस्के, गणेश सातपुते, सर्व नेमनुक पोलीस स्टेशन रामनगर, ता.जि. वर्धा यांनी केली….