संशईतास ताब्यात घेऊन रामनगर डि पथकाने उघड केले दुचाकी चोरीचे दोन गुन्हे,६ चोरीच्या दुचाकीही केल्या हस्तगत….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

एका संशईतासह व एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेऊन रामनगर डि बी पथकाने उघड केले दुचाकी चोरीचे दोन गुन्हे,आरोपींचे ताब्यातुन ६ दुचाकी केल्या जप्त….

रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, रामनगर तसेच वर्धा शहर पोलिस स्टेशन हद्दीतुन सततच्या चोरी होणार्या दुचाकी हे नित्याचे झाले आहे त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार अशा दुचाकी चोरट्यांवर कडक कार्यवाही करण्याचे सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्यानुसार रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बिपीन ईंगळे यांनी त्यांचे अधिनस्त असलेले डि बी पथकास सुचना दिल्या





त्याअनुषंगाने रामनगर डि बी पथकाचे पोहवा गिरीश चंदनखेडे हे आपले पथकासह पोलिस स्टेशन रामनगर येथील अप क्र 223/2024 कलम 303(2) Bns मधील चोरीस गेलेला मोटरसायकलचा व आरोपीचा शोध घेणे करीता  पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा नितीन विजय खावडे वय 27वर्ष रा. सालोड हिरापूर वर्धा याने एका विधी संघर्षित बालकांसह केल्याचे निष्पन्न झाले



यावरुन त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी पोलिस स्टेशन रामनगर येथील अप क्र 223/2024 कलम 303(2) Bns मधील काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची मो. सा क्रमांक MH 32 S 1358 किंमत 15000/रु 2) अप क्र 229/25 कलम 303(2) BNS मधील काळया रंगाची एव्हिएटर मोपेड मो.सा क्रमांक MH 32 T 1974 अंदाजे किंमत 10,000/ रु 3) काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मो. सा क्रमांक MH 32 W 6806 किंमत अंदाजे 30,000/रु 4) काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मो.सा क्रमांक MH 31 AR 9076 किंमत अंदाजे 30000/रु 5) काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मो.सा क्रमांक MH 31AN 3865 किंमत अंदाजे 30,000/रु 6) काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मो. सा क्रमांक MH 27 BH असा अर्धवट असलेला किंमत अंदाजे 50,000/ रु असा  किंमत 1,75,000/ रु चा माल जप्त करून आरोपी नितीन विजय खावडे यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक विपीन इंगळे,सपोनि राजेश पाटील डी बी पथकाचे पोहवा गिरीश चंदनखेडे, अमोल राऊत, पोशि चेतन पापळे, अमोल गीते, राहुल भोयर यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!