अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारा SDPO यांचे पथकाचे ताब्यात….
उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणार्याविरुद्ध कारवाई….
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन याचे पुर्व आदेशाने प्रभारी पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे आदेशानुसार तसेच उपविभागिय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली अवैधरित्या रेतीची वाहतुक करणार्यांवर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने दि 30-11-2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांचे पथक हे उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार नरेंद्र डहाके,अश्विन सुखदेवे यांना गोपनीय माहीती मिळाली की वडनेर पोलिस स्टेशन हद्दीतील वर्धा नदीचे पात्रातुन काही ईसम रेतीची चोरटी वाहतुक करत आहे
सदर मिळालेली गोपनीय माहीती उपविभागिय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांना देऊन त्यांचे आदेशानुसार पथकातील पोलिस हवालदार नरेंद्र डहाके,अश्विन सुखदेवे,पोलिस शिपाई आकाश कांबळे, राकेश इतवारे यांनी वर्धा नदीच्या पात्राचे कारेगाव घाट येथून काळी रेती चोरून पोहणा कडे जाणाऱ्या शिव पांदण ने जात असतांना (1) ओम सुरेश मरसकोल्हे, वय 19 वर्ष, रा वेणी हा मालक (2) रोशन शेटे , रा. पोहणा याचा सांगणे वरून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक MH 32 P 3324 लाल रंगाच्या महेंद्र सरपंच 595 ट्रॅक्टर मध्ये आरोपी क्र 1 ओम मरस्कोल्हे च्या ताब्यातील ट्रॅक्टर यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काळी रेती( गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिडून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास काळी रेती (गौन खनिज ) असा एकुन कि 7,57,000/- रु चा माल , पो स्टे, वडनेर येथेवर नमुद आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,.अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे.मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघा रोशन पंडित यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे पथकतील .पोलीस हवालदार नरेंद्र डहाके , अश्विन सुखदेवे, पोलीस शिपाई आकाश कांबळे,राकेश इतवारे यांनी केली