
प्रेमीकेला तु ईधर क्यु आई म्हनत तिच्या मित्रांवर केला खुनी हल्ला,सर्व आरोपी अटकेत..
शुल्लक कारणावरुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे सर्व आरोपींना सावंगी (मेघे) पोलिसांनी केले जेरबंद….
सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३०)रोजी यातील फिर्यादी रहीम शेख शाकीर शेक, रा. हॉटेल मोनटाना समोर, पेट्रोल पंपाच्या मागे, नालवाडी यांचा मित्र अंकुर जैन यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रमाकरीता स्विट अँड ट्रिट कॅफे,
सावंगी (मेघे) येथे गेले असता तेथे फिर्यादी व अंकुर जैन यांचे मित्र व मैत्रीण गौरी हिचे सोबत वाढदिवस साजरा करीत असतांना यातील आरोपी क्र १) अमन कुडमते, २) सुधांशु गिरी, ३) अनिकेत वानखेडे, ४) हर्षल जाधव, ५) अंकित वाटकर उर्फ गरम सर्व रा. वर्धा यांनी आरोपी क्र १ अमन कुडमेथे याची मैत्रीण गौरी हिला तु ईथे वाढदिवसाचे कार्यक्रमाला कशी आली या कारणावरुन सर्व आरोपींनी मिळुन फिर्यादी रहीम शेख शाकीर शेख यास शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच काचेच्या बाटलीने रहीम शेख शाकीर शेख याचे डोक्यावर मारुन जखमी करुन चाकूने फिर्यादीचे डावे हातावर, डावे पायावर व बरगडीजवळ मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा फिर्यादीचे तक्रारीवरुन व मेडीकल सर्टीफिकेट वरुन पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) येथे अप.क्र. ३२६/२०२४ कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदर गुन्ह्याची सावंगी पोलिसांनी तात्काळ दखल घेवुन वरीष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे गोपनीय माहीतीवरुन यातील आरोपी क्र. १) अमन कुडमते, २) सुधांशु गिरी, ३) अनिकेत वानखेडे, ४) हर्षल जाधव, ५) अंकिता वाटकर उर्फ गरम यांना शिताफीने ताब्यात घेवुन गुन्ह्यात अटक करण्यात आली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी, वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे निर्देशाप्रमाणे सहा.
पोलिस निरीक्षक संदिप कापडे ठाणेदार पो.स्टे. सावंगी (मेघे), पोउपनि सरोदे, दुधाने व पोलिस हवा सतिश दरवरे, निलेश सडमाके, अनिल वैद्य, आकाश चुगडे, निखील फुटाने अमोल वानखेडे, चालक वासु वैरागडे, विरेन्द्र कांबळे, अमोल टेकाम सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) यांनी केली.




