
SDPO वर्धा यांचे पथकाची अवैध दारु विक्रेत्यांवर नाकाबंदी करुन छापा…
उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाने सेवाग्राम हद्दीत मदनी येथे नाकाबंदीत अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या वर छापा टाकुन 6,10,800/- रू दारूचा माल केला जप्त…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 19. डिसेंबर 2024 रोजी रात्रीचे दरम्यान वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकास गोपनिय माहीती मिळाली की, रविन्द्र चौहान रा. धोत्रा व त्याचा मित्र एका टाटा कंपनीच्या इंडीगो पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहन क्र एम.एच 29 आर 5267 हीने विदेशी दारूचा माल नागपुर जिल्हयातुन सेवाग्राम हददीतील मदनी चौका कडुन धोत्रा येथे घेवुन जाणार आहे.


अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन पोलीस स्टॉफ सह पोलिस स्टेशन सेवाग्राम हद्दीत मदनी गावातील चौकात नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता मौक्यावर यातील आरोपी 1) रविन्द्र किसन चौहान वय 30 वर्ष रा. वार्ड न. 1. धोत्रा ता.जि. वर्धा 2) प्रेम ज्ञानेश्वर पवार वय 24 वर्ष रा. शिवाजी नगर राळेगांव जि यवतमाळ ह.मु. वार्ड न. 1. धोत्रा ता.जि. वर्धा हे विदेशी दारूचा माल वाहतुक करीत असतांना मिळुन आले त्यांचे ताब्यातुन 1) एक जुनी टाटा कपंनीची इंडीगो सी.एस. पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन क्र एम. एच 29 आर 5267 2) 7 खरड्याचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 336 सिलबंद शिश्या 3) एक जुना वापरता विवो कंपनीचा मोबाईल असा एकुन जु. कि. 6,10,800/- रू चा माल अवैध्यरित्या विनापास परवाना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.तसेच नमुद दोन्ही आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे 1) अपराध क्रमांक 961/2024 कलम 65 अ ई, 77 अ. 83, म.दा.का. सहकलम 3 (1) 181 मो.वा. का अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस स्टेशन. सेवाग्राम करीत आहे.

सदरची कार्यवाही. पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद के. मकेश्वर यांचे सुचनेप्रमाणे विशेष पछतातील पोउपनि परवेज खॉन, पो. हवा. अमर लाखे, पोलिस अंमलदार मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख



