
अवैधरित्या दारुची वाहतुक करणारे विशेष पथकाच्या ताब्यात…
उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे विशेष पथकाने नाकेबंदी करून विदेशी दारूची अवैधरित्या वाहतुक करणारे ताब्यात घेऊन,चारचाकी वाहनासह एकुन 7,31,800 /- रू चा मुद्देमाल केला जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालयातील विशेष पथकाने गोपनिय माहीती काढुन इंदीरा नगर, आदीवासी कॉलोनी, वर्धा येथे नाकाबंदी केली असता मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन मारुती स्विफ्ट डिझायर गाडी थांबवुन तीची तपासनी केली असता त्यात 1) अजय शेषरावजी पुसदकर वय 55 वर्ष रा. सानेगुरूजी नगर आर्वी नाका वर्धा २)लोभेष मनोहर घुगरे वय 22 वर्ष रा. इंदीरा नगर आदीवासी कॉलनी वर्धा 3) गौरव संजयराव जबडे वय 23 वर्ष रा. इंदीरा नगर आदीवासी कॉलणी वर्धा ( विजु भोयर यांचे घरी किरायाने ) यांचे ताब्यातुन 1) मारोती सुझुकी स्विफ्ट डिझायर कंपनीची गाडी क्र. एम. एच / 32 / सि./ 9959 कि. 6,00,000/- रू च्या डिक्की मधुन 2 ) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस कंपनिच्या 1 खर्रडयाचे पुर्ण खोक्यामध्ये तसेच प्लॉस्टीक पन्नीमध्ये एकुण 144 शिश्या 3) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस ब्लु कंपनिच्या 4 अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये तसेच प्लॉस्टीक पन्नीमध्ये एकुण 120 शिश्या 4) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्ट्रॅग (आर.एस) कंपनिच्या 1 अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये तसेच प्लॉस्टीक पन्नीमध्ये एकुण 48 शिश्या 5 ) 90 एम. एल. च्या टॅगो कंपनिच्या देशी दारूने भरून असलेल्या 1 अर्ध्या खर्रडयाचे खोक्यामध्ये व प्लॉस्टीक पन्नीमध्ये एकुण 150 शिश्या 6) 500 एम.एल. च्या स्ट्रोम कंपनीची बियर दारूने भरून असलेल्या प्लॉस्टीक पन्नीमध्ये एकुण 18 शिश्या 7) माझा ओप्पो कंपनिचा अॅड्रॉईड मोबाईल त्या मध्ये एअरटेल कंपनीचे सिम क्र 8482840235 असा एकुण जु. किंमत 7,31,800/-रू. चा माल अवैध्यरित्या मिळुन आला


सदर जप्त मुद्देमाल करण्यात आला सदर आरोपी व सदर विदेशी दारूचा माल हा बादल दिवाकर धवने यांचा आहे व त्यांचे सांगने वरून विदेशी दारूचा माल हा सावंगी आसोला जि. नागपुर हायवे रोडवरील Leopold-9 नावाने असलेल्या रेस्टॉरेन्ट व बार चे चालक / मालक अभिषेक नयन चिंतलवार रा. सावंगी आसोला जि. नागपुर यांचे बार मधुन आणला आहे. असे सांगीतल्याने अभिषेक नयन चिंतलवार यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपींना दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म. दा. का. कलम 82 83 प्रमाणे होत असल्याने सदर गुन्हयात बार मालक व बादल दिवाकर धवने रा. इदिरा नगर, आदीवासी कॉलोनी, वर्धा यांना आरोपी बनविण्यात आले आहे.त्यांचेविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर येथे 1 ) अपराध क्रमांक 321 / 2024 कलम 65 अ ई, 77 अ, 82, 83, म. दा.का. सहकलम 3 (1)181,130 / 177 मो.वा. का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नुरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद के मकेश्वर यांचे मार्गदर्शनानुसार पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, संदीप अलोने यांनी यशस्वी केली



