SDPO वर्धा यांचे पथकाचा अवैध दारु विक्रेत्यावर छापा टाकुन,लाखोंचा मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नविन वर्षाच्या पुर्वदिनी अवैध विक्रीकरीता साठवुन ठेवलेला विदेशी दारूचा साठा छापा टाकुन पकडला, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाची धडाकेबाज कार्यवाही…,

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये नवीन वर्षाच्या आगमनी कुठलाही अनुचीत प्रकार घडनार नाही याची खबरदारी म्हनुन अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि 30 डिसेंबर 2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे विशेष पथक वर्धा उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय माहीती मिळाली की ईंदीरानगर येथील नौशाद उर्फ अच्चु शॉह रा. वार्ड न. 4  आर्वी नाका वर्धा यांनी विदेशी दारूचा माल आणून त्यांचे घरी साठवुन ठेवला आहे





अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार सदरची माहीती उपविभगीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांना देऊन त्यांचे आदेशानुसार सदर विशेष पथकातील पोहवा अमर लाखे  यांनी 1) नौशाद उर्फ अच्यु रमजान शॉह वय 31 वर्षे रा.वार्ड न. 4 इंदीरा नगर आर्वी नाका वर्धा यांचे घरी जावुन छापा टाकुन प्रोव्हीशन रेड केला असता नमुद ठिकाणी त्यांचे घरी त्याचे जवळ काम करणारा 2) रूपेश किसनराव नांदने वय 30 वर्षे रा. वार्ड न. 4 इंदीरा नगर, आर्वी नाका वर्धा हा मिळून आला व नौशाद यांचे घरझडतीतुन 1) एका खरड्याचे खोक्यामध्ये 180 एमएल च्या रॉयल रटॅग कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 48 सिलबंद शिश्या 2) 7 पेटी मध्ये 90 एम.एल.च्या टैंगो कंपनीच्या देशी दारू ने भरलेला 700 सिलबंद शिश्या 3) एक खरड्याचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस ब्लु कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 48 सिलबंद शिश्या 4) एक खरड्याचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 48 सिलबंद शिश्या 5) अर्ध्या खरडयाचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या बकार्डी ब्लॅक रम कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 22 सिलबंद शिश्या 6) एका प्लॉस्टीक चुगंडी मध्ये 750 एम.एल.च्या आफीसर चाईरा कंपनीच्या विदेशी दारु ने भरलेला 25 सिलबंद बंपर 7) एका प्लॉस्टीक चुगंडी मध्ये 375 एम.एल.च्या ओल्ड मंक रम कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला ०४ सिलबंद पांईट तसेच सदर विदेशी दारू आणण्या करीता वापरेले एक जुना वापरता तीन चाकी अॅटो क्र एम्.एच. 32 बी 6154 य एक विवो कपंनीचा मोबाईल असा एकुन कि. 3,64,100/- रू चा माल मिळून आला.



सदर विदेशी दारूचा माल कोठुन व कोणी दिला व कशाने आणला या बाबत विचारपुस केली असता आरोपी यांनी सांगीतले की सदर दारूचा माल हा मुकेश जयस्वाल रा. पुलगांव याने शांती नगर वर्धा येथे  आणून दिला व तेथून आरोपी यांनी विदेशी दारूच्या पेटया त्यांचे जवळील तीन चाकी अॅटो क्र एम.एच. 32 वी 6154 मध्ये टाकुन घरी आणुन ठेवले असे सांगीतल्याने सदर विदेशी दारूचा  जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला यावरुन पोलिस स्टेशन रामनगर येथे आरोपी  1) नौशाद उर्फ अच्यु रमजान शॉह वय 31 वर्षे रा.वार्ड न. 4 इंदीरा नगर, आर्वी नाका वर्धा 2) रूपेश किसनराव नांदने वय 30 वर्षे रा. वार्ड न. 4 इंदीरा नगर, आर्वी नाका वर्धा 3) मुकेश जयरवाल रा. पुलगांव यांचे विरुध्द 1) अप क्र.1032/ 2024 कलम 65 ई. 77 3. 83, म.दा.का. अन्यये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर करीत आहे



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे याचे विशेष मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, प्रमोद के मकेश्वर यांचे सुचनेप्रमाणे विशेष पथकातील पो.उप.नि. परवेज खान पो.हवा. अमर लाखे, पोअंमलदार मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, सचिन भालशंकर यांनी  पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!