सेलु पोलिसांची गावठी मोहादारु विरोधात कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सेलू पोलिसांची दारुबंदी कायद्याअन्वये कारवाई…

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सेलु कडील डी बी पथकाचे अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त करुन दैनंदिन कामाचा आढावा घेत असतांना दिनांक 23/03/2024 रोजी सकाळी 08.00 वा चे सुमारास दुचाकी मोटरसायकल वाहन क्र. MH32T1322 ने खापरी येथून सेलू कडे 2 इसम विना परवाना गावठी मोहा दारूची वाहतूक करणार आहे अशा मुखबीरकडून खात्रीशीर माहिती वरुन घोराड तात्काळ रवाना होऊन तेथे सापळा रचून थांबलो असता मिळालेल्या माहिती प्रमाणे दोन इसम हा एका काळसर रंगाच्या हिरोहोंडा कंपनीच्या मोटर सायकल क्र. MH32T 1322 ने सोनिया नगर मधून सेलू कडे रोडणे येताना दिसल्याने व ते मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे असल्याने त्याला पंचासमक्ष थांबण्याचा ईशारा करुन सदर मोटर सायकल पो.स्टापचे मदतीने रोडच्या बाजूला थांबवून त्याला पंचासमक्ष त्यांचे नाव गाव विचारले असता मोपेड चालक याने त्याचे नाव 1) आकाश पांडुरंग उईके वय 24 वर्ष राहणार शिवणगाव 2) कृष्णा कुंडलिक भजन कर वय 45 वर्ष राहणार खापरी हे संगणमताने आपले ताब्यातील मोटरसायकलने गावठी मोहा दारूची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांचे ताब्यातून 78 लिटर गावठी मोहा दारू व डबकी किंमत 16200/- रू. एक हिरो होंडा कंपनीची सीडी डीलक्स मोटर सायकल क्र. MH32T1322 किंमत अंदाजे 50,000/- रू. असा जुमला किंमत 66,200 रू चा. मुद्देमाल मिळून आल्याने नमूद आरोपी विरुध्द पो.स्टे सेलू येथे कलम 65(अ) (ई),83 मदाका, सहकलम 3(1), 181,130, 177 मोवाका प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.





सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक  नुरुल हसन,  अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा  प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सपोनि. तिरुपती राणे यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे, होमगार्ड तेलरांधे सर्व नेमणुक पोलिस स्टेशन सेलू यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!