
निवडनुकीच्या अनुषंगाने सेवाग्राम पोलिसांची SDPO यांचे उपस्थितीत पारधी बेड्यावर मोठी कार्यवाही,१५ लक्ष रु चा मुद्देमाल केला नष्ट,१० आरोपी ताब्यात….
उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे उपस्थितीत सेवाग्राम पोलिसांची निवडनुकीच्या अनुषंगाने मांडवगड पारधी बेड्यावर कोंबींग राबवुन १० दारुविक्रेत्यांना ताब्यात घेऊन १५ लक्ष रु चा मुद्देमाल केला नष्ट….


सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडणूक संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी सेवाग्राम पोलिसांनी उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे उपस्थितीत आज दि(६)नोव्हेबर रोजी पो स्टे सेवाग्राम हद्दीतील मांडवगड पारधी बेडा या ठिकाणी कोंबिंग राबविण्यात आले

सदर कोंबींगमधे बेड्यावरील 10 विक्रेते आणि भट्टीद्वारे मोहादारू काढणारे शैलेंद्र सुधाकर पवार,२ विकी गुलाबराव भोसले, सारिका संदीप पवार,साधना पवार,संदीप सौजा पवार,अनिता पवार,बिना अरविंद भोसले, धनराज सुधाकर पवार,सचिन हंसा पवार, साधना सुनील पवार सर्व राहणार मांडवगड पारधी बेडा यांच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

तसेच.चालू भट्ट्या,सडवा,गाळलेली दारू असा एकूण 15,00,000/- रु चा माल नष्ट करण्यात आला
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांच्या उपस्थितीत ठाणेदार सपोनि विनीत घागे पोलिस स्टेशन,सेवाग्राम, पोउपनि आमणे,लोहकरे,DB पथक व इतर 15 अंमलदार यांनी केली


