विशेष पथकाची बारसद्रुश्य देशीविदेशी दारुची विक्री करणार्याच्या आवळल्या मुसक्या…
विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने छापा टाकुन एकास घेतले ताब्यात…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) जुन रोजी पोलिस अधिक्षक यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांवर कार्यवाही करणेकामी पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की वडार वस्ती महीला आश्रम येथे दिलिप माणिक लक्षर हा खुलेआम देशी-विदेशी दारुची चिल्लर विक्री करीत आहे
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकाने तसेच पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील पोलिस स्टॉफसह वडार वस्ती येथे प्रोविशन रेड केली असता त्याठिकाणी दिलीप लक्षर हा दारु विक्री करतांना आढळुन आला यावरुन त्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन 1) 500 ml चे टुबर्ग व किंगफिशर कंपनीचे बियर ने भरलेल्या 38 कॅन प्रती की.500/-₹ नुसार 19,000/-₹ 2) 90 ml चे टांगो कंपनीचे देशी दारू ने भरलेल्या 2 बॉटल्स प्रती की.70/-₹ नुसार 140/-₹ 3) एक हिरो स्प्लेंडर मोटासायकल* क्र. MH 32 AP 3021 किंमत 60,000/- 4) एक हायर कंपनीचा डीप फ्रिझर किंमत 30,000/-₹ 5) एक अँड्रॉइड मोबाईल फोन किंमत 10,000/-₹ असा एकूण 1,19,140/-₹ चा माल जप्त करण्यात आला तसेच दिलीप माणिक लक्षर वय 42 रा. वडार वस्ती महीला आश्रम वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व त्यास मुद्देमालासह पो.स्टे. वर्धा शहर स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकातील सपोनि. मंगेश भोयर, पोलिस
अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालदे, प्रदिप कुचनकर, सुगद चौधरी तसेच पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील पोलिस स्टॉफ यांनी केली.