
वर्धा शहरातील प्रसिध्द सराफास गंडविणारा पोलिसांचे ताब्यात,वर्धा शहर डि बी पथकाची कामगिरी….
ॲानलाईन पैसे पाठवतो अशी बतावनी करुन शहरातील प्रसिध्द सराफा व्यापार्यास १० ग्रॅम वजनाची चैन खरेदी करुन ,९५ हजाराचा गंडा घालणाऱ्यास भामट्यास वर्धा शहर पोलिसांच्या डि बी पथकाने नागपुर येथुन घेतले ताब्यात….
वर्धा(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 20 मार्च रोजी वर्धा येथील प्रसिध्द सोने व्यापारी विपुल विलास करंडे वय 32 वर्ष रा. कपडा लाईन ता. जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली कि यातील अज्ञात आरोपी याने आदल्या दिवशी करंडे यांना फोन करुन विचारले की उद्या तुमची दुकान सुरु आहे का मला 10 ग्नॅम वजनाची सोन्याची चैन विकत घ्यायची आहे असे म्हणुन तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर NEFT करतो तुम्ही मला अकाउंट डिटेल पाठवा


त्यावर फिर्यादी दुकान मालक करंडे यांनी होकार दर्शविला यावरुन आरोपी यांनी मि उदया येवुन सोणे खरेदी करतो. असे म्हणुन सदर आरोपी दि 20 मार्च 2025 रोजी दुपारी 12.48 वा चे सुमारास व्हि.जे. के. ज्वेलर्स कपडा लाईन वर्धा येथे सोने खरेदी करण्याकरीता आला व त्याने 10 ग्राम वजनाची एक 01 चैन पसंत केली त्याची एकुण किंमत 95000/रु. अशी झाली असता त्याने फिर्यादी करंडे यांचे अकाउंन्ट डिटेल्स घेवुन त्यांचे अकाउंन्ट वर 01 रुपये पाठवला तो 01 रु. फिर्यादी यांचे अकाउंन्ट ला आला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यास बिल बनवायला सांगीतलेत्यानंतर आरोपीने त्याचे मोबाईल मध्ये काहितरी केले व नंतर त्याने त्याची एकुण 94,999/रु. चा ऑनलाईन ट्रान्सफर आर.टि.जि.एस. केल्याची पावती फिर्यादी यांला दाखवीली व आरोपी यांनी घाई घाईत लगेच 10 ग्राम सोण्याची चैन घेवुन गेला. परंतु फिर्यादी हे हिशोब करायला बसले तेव्हा त्यांना लक्षात आले की सदरचे पैसें अकाउंन्टला आले नाही असे फिर्यादी करंडे यांचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन वर्धा शहर ला अप.क 724/2024 कलम 318(4),336 (3),340(2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होती व तपास सुरु होता

सदर गुन्ह्याचा तपास व यातील अज्ञात आरोपीचा शोध ठाणेदार पराग पोटे यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन वर्धा शहर डी बी पथक करीत होते यातील अज्ञात आरोपीचा तांत्रीक द्रुष्ट्या शोध घेतला असता नमुद गुन्हयातील आरोपी विशेष भारत धांडे वय 33 वर्ष रा. कळमणा नागपुर यास निष्पन्न करुन सापळा रचुन मोठ्या शिताफीने नागपुर येथुन ताब्यात घेतले सदर आरोपीस विचारपुस केली असता त्याने मजा मारण्यासाठी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्याची अजुन सखोल चौकशी केली असता त्याने पोलिस स्टेशन वरोरा जि. चंद्रपुर येथे देखील अप क्रमांक 158/2025 कलम 318 (1), BNS प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल केले. यावरुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असुन पुढील तपास सुरु आहे. नमुद आरोपी यास मा. कोर्टासमोर हजर करुण त्याचा पि.सी.आर. प्राप्त करुण पि.सी. आर. दरम्यान नमुद आरोपीचे ताब्यातुन 23.500/- ग्राम सोने व त्याचा मोबाईल असा एकुण किंमत 2,34,065/- रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा. अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक सा. मा. सागरकुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. प्रमोद मकेश्वर, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सा. पराग पोटे यांचे मार्गदर्शनात डिबी पथकाचे पोलिस ठाणे वर्धा शहर येथील पोउपनि शरद गायकवाड ,पोहवा प्रशांत वंजारी, नापोशि नरेंद्र कांबळे, पोशि श्रावण पवार, वैभव जाधव, प्रशांत मुडे व सायबर सेल वर्धा येथील पोहवा अक्षय राऊत, मपोशी स्मिता महाजन यांनी केली.


