शेतीअवजार खरेदीच्या नावावर पवनार येथील शेतकर्याची आर्थिक फसवणुक करणारा भामटा वर्धा सायबर पोलिसांच्या जाळ्यात,गुजरात येथुन केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वर्धा – सणासूदीचे काळात ऑनलाईन खरेदीमध्ये सतर्कता बाळगण्याचे नागरीकांना आवाहन ऑनलाईन युगात सर्वच गोष्टी ऑनलाईन मिळत असल्याने त्यातील कोणत्या जाहीरातीवर विश्वास ठेवावा व कोणत्या नाही यामध्ये सामान्य नागरीकांची फसगत होणे नित्याचेच झाले आहे. घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक साहित्य एवढेच नाही तर आता गोवंश आणि शेती अवजारे सुध्दा ऑनलाईन खरेदी करण्याच्या भूलाव्यात नागरीक अडकत आहेत.
अशाच प्रकारच्या फसवणूकीत दिनांक ०९/०२/२०२३ रोजी मौजा पवनार येथील निवासी

 सचिन नारायणजी दानव, वय 32 वर्ष, रा. वार्ड क्र. 2 पवनार, जिल्हा वर्धा





यांना रोटावेटर व इतर शेती साहित्य घ्यायचे होते. त्यांना फेसबूकवर शक्तीवान इंजीनीअरीग ट्रॉली या कंपनीची जाहीरात पाहीली व जाहीरीतीवर असलेल्या मो.क. 8200175770 व्हॉटसअप मॅसेज करून संपर्क केला. आरोपी याने फिर्यादीला विश्वासात घेवून वेगवेगळी व कमी किंमतीत वस्तू देण्याचे प्रलोभन दिले. फिर्यादीने रोटावेटर, नागर, तीरी पंजी, व्ही पास एक्का या वस्तूंचे ऑर्डर केले. त्यांचे संपूर्ण किंमत 1,97,640/-रू आरोपीचे अॅक्सीस बँक खाते क्रमांक 923010004533563 वर पाठवीले. त्यांनतर बरेच दिवस फिर्यादी यांनी माहिती आपल्या स्तरावर शहानीशा करून आपल्या शेती साहित्याची वाट पाहिली व सतत आरोपी यांस संपर्क करून विचारपसू केली. परंतू  ६ महिन्यांनंतर सुध्दा त्यांना शेती साहित्य प्राप्त न झाल्याने दिनांक १२/०२/२३ रोजी सायबर पोलिस स्टेशन वर्धा येथे तक्रार दिल्यावरून अप क्रमांक 18/2023 कलम 419, 420 भा.द.वि. सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये शेती व्यवसायात असलेल्या फिर्यादीच्या होणा-या आर्थीक कुचंबणेची दखल पोलिस अधिक्षक . नूरूल हसन व अपर पोलिस अधिक्षक . सागर कवडे यांनी घेतली व पोलिस निरीक्षक  कांचन पांडे पो.स्टे. सायबर यांना सदर गुन्हयात जलद तपास करण्याकरीता आदेशीत केले. तांत्रीक तपासाअंती मिळालेल्या माहितीवरून सदर आरोपी हा गुजरात येथील राजकोट येथून गुन्हयाची सुत्रे हलवत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. त्यावरून पो.उप.नि. राहूल ईटेकार, पो.हवा. कुलदीप टांकसाळे, सचीन सोनटक्के व पो.हवा. रंजीत जाधव यांचे पथक तयार करून दिनांक 27.10.2023 रोजी राजकोट, गुजरात येथे रवाना करण्यात आले. तपास पथकाने पुढील 4 दिवस अहमदाबाद, राजकोट व जी. आय.डी.सी. शापर जिल्हा राजकोट येथे अहोरात्र तपास व शोधमोहीम राबवून गुन्हयातील आरोपी



अक्षय नरेनभाई भिंबा, वय 23 वर्षे, रा. सेक्टर नंबर तेजस्वी हनूमान मंदीर, पारडी, पो.स्टे. शापर वेरावल, जि. राजकोट गूजरात



यांस अटक केली. आरोपीकडून गुन्हयात फसवणूक करण्यात आलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे व तसेच
गुन्हयात वापरलेले मोबाईल हॅन्डसेट, बँक अकाऊंटचे एटीएम कार्ड असा एकूण १९७०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला मा. न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असून मा. न्यायालयाने दिनांक ०३/११/२०२३ रोजी पावेतो पोलिस कोठडी रिमांड दिलेला आहे.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक  नूरूल हसन व अपर पोलिस अधिक्षक श्री. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक  कांचन पांडे पो.स्टे. सायबर यांचे निर्देशाप्रमाणे तपास पथक पो.उप.नि. राहूल ईटेकार, पो.हवा. कुलदीप टांकसाळे, सचीन सोनटक्के व पो.हवा, रंजीत जाधव यांनी तांत्रीक सहाय्य
पुरविणा-या पो.हवा. निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, अनूप राऊत, वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, मिना कौरती ना.पो.शि. अक्षय राऊत, गोवींद मुंडे, विशाल मडावी, अमीत शुक्ला, अनूप कावळे पो. शि. अंकित जिभे प्रतिक वांदीले, म.पो.शि. स्मिता महाजन यांचे मदतीने केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!