
शेतीतील पंप चोरट्यास काही तासाचे आत हिंगणघाट पोलिसांनी केले जेरबंद….
शेती साहित्याची चोरी करणारे चोरटे काही तासाचे आत हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात….
हिंगणघाट(वर्धा) – पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नितीन शंकरराव ढगे वय 33 वर्ष रा गवा( कोळी) ता समुद्रपूर जि. वर्धा यांचे तोंडी रिपोर्ट वरून दिनांक 04/12/2025 चे सकाळी 07/00 दरम्यान फिर्यादी आजंती शिवारातील मक्याने केलेल्या शेतातील कॅनल मध्ये शेती ओलीत करण्याकरता ठेवलेली एक 3 Hp टर्बो कंपनीची मोटार पंप की.10,000/- रु.माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्यावरुन अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला होताव सदर गुन्हयांचा तपास पोलिस निरीक्षक अनिल राऊत ठाणेदार. हिंगणघाट यांचे आदेशाने डिबी पथक करीत होते



त्यानुसार 04/12/2025 रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोबरे, हे त्याचे पथकासह पोस्टे परिसरात सदर गुन्ह्याच्या आरोपी शोध संबंधाने पेट्रेलिंग करीत असता गुप्त माहिती मिळाली की, गणेश घुमडे नामक इसमाने त्याच्या चारचाकी वाहनाने आजंती शिवारातून एक मोटर पंप चोरून त्याच्या शेतात ठेवली आहे. अशा माहितीवरून गणेश घुमडे यांच्या शेताची माहिती काढून शहालंगडी मागील परिसरात शोध घेतला असता एक चार चाकी वाहन शेताजवळ दिसून आल्याने गणेश लक्ष्मणराव घुमडे वय 31वर्ष रा. ओंकार नगर हिंगणघाट यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मी माझ्या साळ्याच्या मदतीने माझ्या चार चाकी वाहनाने आजंती शिवारातील मोटर पंप चोरी केल्याची कबुली दिली त्याचे शेतात पाहणी केली असता एक टर्बो कंपनीची मोटर पंप मिळून आल्याने जप्ती पंचनामा कारवाई दरम्यान 1) ) 3 Hp टर्बो कंपनीची मोटार पंप की.10,000 रु.2) एक ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल की,20,000,3) एक रियल मी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल की.15000रु. 4) एक फोर्ड कंपनीची इंडीवीयर चार चाकी क्रमांक MH 27,AG7000 की.2,50,000 रु असा एकूण जुमला किंमत 2,95,000 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन असून दोन्ही आरोपी विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे,उपविभागिय पोलीस अधिक्रारी हिंगणघाट, सुशील कुमार नायक यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस निरीक्षक अनिल राऊत पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे यांचे आदेशानुसार डि बी पथकाचे पोहवा प्रशांत ठोंबरे,नापोशि राजेश शेंडे , पोशि आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहित साठे यांनी केली . सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे




