अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा विशेष पथकाच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील विशेष पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई….

हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सणाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना नाकाबंदी व रात्रगस्त करण्याचे आदेश निर्गमीत केले होते त्यानुसार दि 15.03.2024 रोजी डी बी पथकातील पोलिस कर्मचारी, चेतन पिसे, जगदीश चव्हान, सचिन घेवंदे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की , विशाल झाडे रा. संत ज्ञानेश्वर वार्ड शाहलंगडी रोड हिंगणघाट व धिरज उर्फ गांजा गजानन साळवे वय 19 वर्ष रा.शास्ञी वार्ड हिंगणघाट असे संगणमत करून त्याचे मारोती सुझुकी कंपनीच्या काळ्या रंगाच्या जीचा क्र MH01AH0838 या कारने देशी दारूची विना परवाना अवैद्यरित्या वाहतुक करून जाम मार्गे संत ज्ञानेशवर वार्ड हिंगणघाट कडे येत आहे अशा माहीती वरून ज्ञानेशवर वार्ड हिंगणघाट येथील रोडवर पोलिस पथकासह  नाकेबंदी करून प्रो रेड केला असता आरोपी क्र 1) धिरज उर्फ गांजा गजानन साळवे वय 19 वर्ष रा.शास्ञी वार्ड हिंगणघाट हा मिळुन आला व आरोपी कार चालक विशाल झाडे हा कारमधुन पसार झाल्याने आरोपी धिरज उर्फ गांजा गजानन साळवे वय 19 वर्ष रा.शास्ञी वार्ड हिंगणघाट याचे ताब्यामधुन 90 एम एल च्या देशी दारूने भरून असलेल्या 18 खोक्याचे खर्ड्यात एकुण1800 शिश्या प्रति शिशी 100/रू प्रमाणे 1,80,000/रू व एक काळ्या रंगाची मारोती सुझुकी कंपनीची MH01-AH0838 चार चाकी कार किंमत अंदाजे 5,00,000/रू व नमुद आरोपीचे झडतीत मिळालेला विवो कंपनीचा स्मार्ट फोन किं 10,000/रू असा एकुण 6,90,000/रू चा माल मिळुण आल्याने नमुद दोन्ही आरोपी विरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.





सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगणघाट  रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनोज गभने याचे निर्देशाप्रमाणे, पोलीस हवा पिसे,जगदीश चव्हान, सचिन घेवंदे, नापोशि स्वप्नील जिवने, पोशि आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांनी केली .







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!