पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन नवरात्री उत्सवादरम्यान राबविले जाताय विविध उपक्रम…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  सध्या सुरु असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान पोलिस विभागामार्फत विद्यार्थी, महिला व सर्व
सामान्य नागरिक यांच्यात सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा व नियमन इत्यादी बाबत जागृती निर्माण होण्याकरिता पोलिस अधीक्षक . नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन विविध
कार्यक्रमांचे आयोजन पोलिस विभागामार्फत करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमामध्ये वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा व नियमन इत्यादी विषयावर
मार्गदर्शन करण्यात येत आहे. नमुद कार्यक्रमांचा भाग म्हणुन दिनांक १९.१०.२०२३ रोजी शहरातील ऑटो रिक्षा, स्कुल बस, व अवजड वाहनांचे चालक यांचे करिता मोफत नेत्र तपासणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये एकुण १५० पेक्षा जास्त चालकांनी सदर कार्यक्रमाला हजेरी लावली होती व त्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. शहरातील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. विनोद अदलखिया व जिल्हा रुग्णालय येथील डॉ. नेहल
मोहता यांचे टिम मार्फत मोफत तपासणी करण्यात आली असुन डॉ. अदलखिया यांनी नमुद कॅम्प मध्ये तपासणी करण्यात आलेल्या चालकांना गंभीर नेत्र आजार असल्यास स्वतः चे रुग्णालयात
मोफत तपासणी करणार असल्याचे जाहीर केले.
सदर कार्यक्रमाला  पोलिस अधीक्षक,  नूरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा , प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलिस अधिकारी, हिंगणघाट . रोशन पंडित, उपविभागीय पोलिस अधिकारी, पुलगाव संजय पवार, वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी विनित घागे, कल्याण शाखेचे प्रभारी  लक्ष्मण लोकरे तसेच डॉ. विनोद अदलखिया व त्यांची टिम तसेच

डॉ. नेहल मेहता व त्यांची टीम हजर होती









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!