आंजी येथील कुख्यात दारुविक्रेता मुकेश रेवतकर याचेवर MPDA नुसार कार्यवाही….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

आंजी येथील कुख्यात दारु विक्रेता मुकेश उर्फ विनोद गोपीनाथ रेवतकर याचेवर निवडनुकीच्या अनुषंगाने MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,नागपुर जेल येथे रवाना….

खरांगना(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन खरांगना हद्दीतील आंजी मोठी येथील सराईत दारू विक्रेता मुकेश उर्फ विनोद गोपीनाथ रेवतकर वय 38 वर्ष यास जिल्हा दंडाधिकारी श्री राहुल कर्डीले यांनी 01 वर्षासाठी नागपूर जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिनांक 13/11/24 रोजी निर्गमित केले.





सदर आरोपी विरुद्ध 20 पेक्षा जास्त अवैधरित्या गावठी मोहादारू विक्रीचे, मारहाणीचे, जुगाराचे गुन्हे दाखल होते. त्याला 2022 मध्ये वर्धा जिल्ह्यातून हद्दपार केले होते तरीही त्याने गुन्हे करणे सुरूच ठेवले होते त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने सदरचा प्रस्ताव तयार करुन सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव यांचे मार्फतीने मा.जिल्हाधिकारी यांना सादर केला सदर प्रस्तावास आजरोजी मा जिल्हाधिकारी यांनी मंजुरी देताच सदरचा आदेश तामील करुन कुख्यात दारुविक्रेता मुकेश उर्फ विनोद गोपीनाथ रेवतकर यास एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे आदेशाने तसेच सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन खरांगनाचे ठाणेदार सहा पोनि सदाशिव ढाकणे, नापोशि धीरज मिसाळ यांनी MPDA प्रस्ताव तयार करून पाठवला होता. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार संजय खलारकर, अमोल आणि पोलिस स्टेशन खरांगनाचे पो उप नि फडणवीस, अंमलदार विनोद सानप, मनीष वैद्य, अविनाश नवराते, अमर करणे, प्रवीण राठोड यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!