स्थागुशा पथकाने उघड केला चोरीचा गुन्हा….
अंतोरा येथील बांधकामाचे साहीत्य मिक्सर व सिमेंट चोरणारे अट्टल चोरटे,स्थागुशा पथकाने केले जेरबंद त्यांचे ताब्यातुन एकूण 5,16,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त…
आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २२ रोजी फिर्यादी सुरज ढोले वय 31 वर्षे पोलिस स्टेशनला तक्रार दिली की त्यांना मानीकगड अंतोरा येथील विकास कामाचा काँट्रॅक्ट मिळाला असल्याने त्या कामाचे लेबर काँट्रॅक्ट त्यांनी लेबर ठेकेदार अजय लव्हाळे यांना दिला परंतु दि. 19.02.2024 चे 07.00 वा. चे सुमारास कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी बांधकाम मटेरियल बनविण्याकरिता वापरात येणारी मिक्सर मशिन कि. 1,00,000/रू 2)70 पोते चेतक कंम्पनिचे सिमेंट की. 28,000/- रू असा जु. की. 1,28,000/- रू चा माल कामावरून चोरून नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून दिनांक (23) रोजी पोलिस स्टेशन आष्टी येथे अप क्र. 83/2024 कलम 379 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता व पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सुरु होता
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा उपविभाग आर्वी पथक करीत असतांना खास बातमीदाराकडुन मिळालेल्या खबरेवरून व तांत्रीक तपासा वरून सदरचा गुन्हा हा
1) अजय राहुलजी लव्हाळे वय 31वर्ष, रा. लाडकी बुजरूक ता. मोर्शी जि. अमरावती यांने केल्याचे निष्पन्न झाले वरुन त्यास ताब्यात घेवुन कसुन विचारपूस केली असता आरोपी याने सदरचा गुन्हा हा
नितीन रामरावजी गाडे वय 29 वर्ष रा. लाडकी बुजरूक ता. मोर्शी जि. अमरावती यांचेसोबत मिळुन केल्याचे कबुली दिली. त्यावरून आरोपी क्र. 1व 2 यांचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला माल व गुन्ह्यातील चोरी करतेवेळी वापरलेली फोर व्हीलर गाडी असा एकुन किंमत 5,16,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपी व जप्त मुद्देमाल 1)एक जुनी वापरती बांधकाम मटेरियल बनविण्याकरिता वापरात येणारी मिक्सर मशिन कि. 1,00,000/- रू 2)40 पोते चेतक कंम्पनिचे सिमेंट की. 16,000/- रू 3) एक टाटा ए.सी.ई. फोर व्हीलर गाडी क्र. MH-04-EB-8150 मालवाहू कि. 4,00,000/- रू असा एकुन किंमत 5,16,000/- रू चा मुद्देमाल जप्त केला. व सदरचा जप्त माल तपासी अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिलसिंग पवार यांचे सहकार्याने स्थागुशा पथकाचे पोउपनि. ऊन्दीरवाडे सफ़ौ. संतोष दरगुडे, पोहवा. भूषण निघोंट, नापोशी. विकास अवचट, राकेश आष्टणकर, हर्षल सोनटक्के यांनी केली.