अखेर सालोड येथील दारुतस्कर महीला शालु हिचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…
सावंगी मेघे हद्दीतील कुख्यात दारूतस्कर शालु हिचेवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….
सावंगी(मेघे)वर्धा प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने ही निवडणूक निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभनमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या उद्देशाने मोठया प्रमाणात दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यावर आळा घालण्यासाठी अशा दारुविक्रेत्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारींना दिले होते
त्यानुसार पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील मौजा सालोड हिरापुर, ता. जि. वर्धा येथे मोठया प्रमाणात ोदेशी, विदेशी तसेच गावठी मोहा दारूची अवैधरीत्या विकी तसेच कच्चा मोहा रसायन सडवा तयार करून गावठी मोहा दारूची हातभट्टी चालविणारा कुख्यात दारूविक्रेती महिला शालू सुधिर खोब्रागडे उर्फ शालू सागर येरेकार वय 47 वर्ष रा. सालोड हिरापुर हिचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा सन 1949 अन्वये सन 2016 ते 2024 पावेतो एकुण 77 गुन्हयांची नोंद आहे. ज्यामध्ये मोठया प्रमाणात गावठी मोहा दारू तसेच देशी दारूचा आपले राहते घरी अवैधरीत्या साठा करून दारूची चोरटी विक्री तसेच वाहतुक करीत होती.
सदर कालावधी मध्ये तिचेवर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून लाखो रूपयाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. सदर महीला
दारूविक्रेती हिचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा तिचे दारूविक्रीचे व्यवसायावर कोणताही परीणाम झालेला नव्हता. ज्यामुळे पोलिस स्टेशन सावंगी मेघे परीसरातील सार्वजनिक स्वास्थ्यावर विपरीत परीणाम झाला होता तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बाधित झाली होती.म्हनुन तत्कालीन ठाणेदार धनाजी जळक यांनी प्रस्ताव तयार केला होता त्यास सध्याचे ठाणेदार सपोनि व प्रभारी पोलिस स्टेशन,सावंगी मेघे संदिप कापडे यांनी पाठपुरावा करुन एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची करून प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलिस अधिकारी, वर्धा यांनी योग्यरीत्या पाठपुरावा करून स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक,वर्धा नूरून हसन, यांचे मार्फतीने मा. राहूल कर्डीले, जिल्हा दंडाधिकारी वर्धा यांना सादर करण्यात आला होता.
सदर स्थानबध्द प्रस्तावाची वरीष्ठ पातळीवर गंभीर दखल घेवून तसेच आगामी होवू घातलेल्या सार्वत्रीक निवडनुकीच्या अनुषंगाने
स्थानबध्दतेची कार्यवाही करण्यात आलेली आहे.दि. (22) रोजी स्थानबध्दतेचा आदेश पारीत करण्यात आलेला असून सदर स्थानबध्द महीला शालु हिस नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.तसेच पुढे होवू घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणुक 2024 लक्षात घेता निवडणूक हया निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभनमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या उद्देशान येणाऱ्या कालावधी दरम्यान अशा दारू विक्रेत्यांवर तसेच गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांनी दिलेले आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे व उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात, सहा.पोलिस निरीक्षक संदिप कापडे ठाणेदार सावंगी मेघे, संजय खल्लारकर, अमोल आत्राम स्थागुशा वर्धा, स.फौ. नबी शेख, पोहवा जावेद धामीया, सतिष दरवरे, मपोहवा सरोज पाली, पो.शि निखील फुटाणे
पो.स्टे. सावंगी मेघे यांनी केली.