
दारुविक्रेत्यावर MPDA ची १२ वी कार्यवाही,आंजी मोठी येथील दारुविक्रेता अमोल भोकटे यास स्थानबध्द करुन केले जेल रवाना..
खरांगना पोलिस स्टेशन हद्दीतील आंजी येथील दारुविक्रेता अमोल भोकटे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कार्यवाही,आतापर्यंत १२ दारुविक्रेत्यांवर व २० ईतर गुन्हेगारावर झाली कार्यवाही….
खरांगना(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैधरित्या दारुची वाहतुक,विक्री,निर्मीती करणाऱ्या विरुध्द पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी मोर्चाच उघडला वारंवार कार्यवाही करुनही काही दारु विक्रेते कायद्याला न जुमानता आपला व्यवसाय राजरोसपणे चालु ठेवलेला दिसत असतांना त्यांचेवर अंकुश बसावा गावात शांतता राहावी याकरीता पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अशा मुजोर दारुविक्रेते यांचेवर कठोर शासन व्हावे याकरीता त्यांचे स्थानबध्दतेचे प्रस्ताव पाठवण्यास सर्व प्रभारींना आदेश देण्यात आले होते


त्या अनुषंगाने खरांगना पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंजी (मोठी) या गावातील आरोपी अमोल नामदेवराव भोकटे वय 37 वर्ष वार्ड नंबर 2 आंजी मोठी तालुका वर्धा जिल्हा वर्धा यांचे विरुध्द ठाणेदार पोलिस स्टेशन खरांगना सदाशिव ढाकणे यांनी सदर प्रस्थान सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचे मार्फतीने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे द्वारे मा.जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवण्यात आला होता सदर प्रस्थावास मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा यांच्या आदेशावरून स्थानबध्द प्रस्ताव क्रमांक 01/ 2024 कलम 3 MPDA अन्वये 01 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित करण्यात आला.सदर आरोपीस दिनांक 7/8/24 रोजी एक वर्षासाठी नागपूर जेलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर आरोपी विरुद्ध 22 गुन्हे दारूबंदी कायद्यान्वये दाखल होते.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे,सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सदाशिव ढाकणे ठाणेदार पोलिस स्टेशन खरांगना,पोलिस नाईक धिरज मिसाळ तसेत स्थानिक गुन्हे शाखेतील पोहवा संजय खल्लारकर यांनी केली



