महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापनदिनानिमित्य वर्धा पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन / रेजींग डे म्हणून साजरा
करण्यात येत आहे. त्या निमीत्याने वर्धा जिल्हा पोलिस दलातर्फे दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2024 दरम्यान पोलिस अधिक्षक कार्यालय तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे
स्त्रिया, वरीष्ठ नागरीक, लहान मुले, सर्वसामान्य नागरीकांमध्ये सुरक्षिततचे वातावरण तयार व्हावे यासाठी वृध्दाश्रम, शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी, स्त्रिया यांच्यामधे जावून सलोखा निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच पोलिस विभागाच्या वेगवेगळ्या विभागाबद्दल माहिती देवून जनजागृती करण्यात
येणार आहे.
पोलिस मुख्यालय, वर्धा येथे पोलिस विभागातील सर्वच शाखाचे कामकाज व जनतेस त्याचा उपयोग याकरीता विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये सायबर सुरक्षा, वाहतूक विभाग, शस्त्रे व दारूगोळा, पोलिस वाहने, डॉग स्कॉड, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, अंमली पदार्थ जनजागृती, दामीनी पथक, होमगार्ड, पोलिसकाका व पोलिसदीदी, स्टूडेंट पोलिस कॅडेट, फॉरेन्सीक हॅन टूल किट, सीव्हील डिफेंस, बॅन्ड पथक, दंगल नित्रयण साधने यांचे एकूण 16 स्टॉल लागणार असून
सर्व जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन दिनांक 04.01.2024 ते 05.01.2024 दरम्यान पोलिस मुख्यालय, वर्धा येथे परेड ग्राऊंडवर आयोजीत करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन हे  सामान्य जनेतेकरीता खुले असणार आहे.
दिनांक 04.01.2024 रोजी वर्ग 7 ते 10 चे शालेय विद्यार्थांकरीता सकाळी 11.00 वा. सायबर गुन्हे व वाहतूक शाखा या विषयावर शालेय विद्यार्थांकरीता परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन पोलिस अधिक्षक नूरूल हसन यांनी केलेले आहे.
महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस दिनांक 02 ते 08 जानेवारी 2024 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!