
अवैधरित्या रेतीचे उत्खणन करुन वाहतुक करणारे पोलिसांच्या ताब्यात…
पुलगाव(वर्धा)- आज दिनांक १२ रोजी सकाळी ६.३० ते ७ वा चे दरम्यान घटना ता. वेळी व स्थळी गोपनीय खबरे वरून पंच व पो.स्टाँफ चे मदतीने रेती चोरी बाबत रेड केला असता नमुद आरोपींनी संगणमत करून वर्धा नदिचे पात्रातील गुंजखेडा घाटातुन अवैधरित्या रेतीचा उपसा करून विनापरवाना रेती चोरून वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन खाली नमुद वर्णनाचा जु.कि. 15,10,000/- रुपये चा माल जप्त करण्यात आला त्यानुसार संबंधीत आरोपी विरूध्द कलम 379,34 भा.द.वी.सहकलम 3(1),181,130/177 मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरचा गुन्हा पोलिस निरीक्षक दारासिंग राजपुत यांचे मार्गदर्शनात पो.हवा.चंद्रशेखर चुटे यांना खात्रीशीर खबर मिळाली की दोन ट्रँक्टर आर्वी ते पुलगाव येणाऱ्या रोडने पुलगाव शहराकडे येत असुन त्यामध्ये अवैध रेतीची वाहतुक होत आहे. अशा खात्रीशीर माहितीवरून आम्ही, पो.स्टाफ व पंचा समक्ष 1) शाम बालाराम ठाकरे वय 29 वर्ष, रा. वार्ड क्र. 03, वल्लभ नगर गुंजखेडा, ता. देवळी 2) ललित इंगळे रा.गुंजखेडा ता. देवळी (पसार) 3) देवानंद रमेशराव वालदे वय 30 वर्ष,रा. गुंजखेडा ता. देवळी 4) चंद्रकांत गजानन सुरवसे वय 25 वर्ष, रा. जोशी प्लॉट, गुंजखेडा ता.देवळी यांचे ताब्यातुन 01) एक जुना वापरता ट्रॅक्टर क्र. एम.एच./32/ए-7411 ज्याची अंदाजे किंमत 6,00,000/- व एक जुनी वापरती ट्राली ज्यावर क्रमांक नसुन त्याचा चेसिस क्रमांक KAI-03-89-15 ज्याची अंदाजे किंमत 1,50,000/- रू. व सदर ट्राली मध्ये भरून असलेली 100 फुट रेती ( 1 ब्रास ) ज्याची अंदाजे किंमत 5,000/- क्रमांक 02) – एक जुना वापरता ट्रँक्टर गाडी क्रमांक नसलेला त्याचा चेसिस नंबर EZ.4001SDN49155 ज्याची अंदाजे किंमत 6,00,000/- व एक जुनी वापरती ट्राली क्र. एम.एच./32/पि./1458 ज्याची अंदाजे किंमत 1,50,000/- रू. व सदर ट्राली मध्ये भरून असलेली 100 फुट रेती ( 1 ब्रास ) ज्याची अंदाजे किंमत 5,000/- असा जु.कि. 15,10,000/- रू. चा माल मिळुन आल्याने पोलीस स्टेशन पुलगाव दाखल अपराध क्रमाक 760/2023 कलम 379,34 भा.द.वी. सहकलम 3(1),181,130/177 मो.वा.का.चा गुन्हा नोद केला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नुरुल हसन.अपर पोलिस अधिक्षक.डॉ.सागर कवडे .उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव संजय पवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार दारासिंग राजपुत पोलिस स्टेशन पुलगाव यांचे निर्देशाप्रमाण पो.हवा.चंद्रशेखरचुटे,ना.पो.कॉ.रवि जुगनाके ,पो.कॉ.ओमप्रकाश तल्लारी, उमेश बेले,संदिप बोरबन यांनी केली आहे.




