
हिट ॲंड रन प्रकरणातील ट्रक चालकास ट्रकसह पुलगाव पोलिसांनी कोलकता येथुन घेतले ताब्यात…,
अपघात करुन चार जणाचा बळी व तिन जणांना जखमी करणारा ट्रक व चालकास पुलगाव पोलिसानी कोलकत्ता येथुन घेतले ताब्यात….
पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगाव येथे दि(05)/जुलै 2024 रोजी सकाळी 09/00 वा. दरम्यान ऑटो चालक सागर मराठे हा त्याचा ऑटो क्रमाक MH-32-B-7356 ने पत्नीसह मौजा इंझापुर येथुन पुलगाव येथे येत असतांना रस्त्याने एक तरुणी, दोन पुरुष व दोन स्त्रिया असे प्रवासी केळापुर बस स्थानकावरुन मिळाल्याने त्यांना ऑटोमध्ये बसवून जेव्हा ऑटो केळापुर बस स्टाफ वरून अंदाजे एक किलोमिटर अंतरावर गेला असता रस्त्याच्या वळणावर अचानक समोरुन एक ट्रक कंटेनरने सदर ऑटोला धडक देवुन अपघात केला. त्या अपघातात चार इसमाचा मृत्यु झाला व ॲटोचालक सागर मराठेसह तीन इसम जखमी झाले अशा सागर मराठे यांचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन पुलगाव अपराध क्रमाक 0667/2024 कलम 105,281,125(A), (B) BNS R/W 134,184 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोद करुन तपास सुरु होता.


सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हाण, यांचे मार्गदर्शनात पोउपनि दिपक निंबाळकर पोलीस स्टेशन पुलगाव येथील त्यांची पोलिस टीम हे तपास करीत असतांना सदर अपघात करणारा ट्रक कंटेनर यांचे रोडवरील सी.सी.टि.व्ही फुटेज प्राप्त करुन ट्रकचा क्रमाक WB-11-F-2177 असा प्राप्त करण्यात आला सदर ट्रक व ट्रक चालक हा कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी ठाणेदार. सार्थक नेहते पोलिस स्टेशन पुलगाव यांचे आदेशाने कोलकत्ता येथे पोलिस उप निरीक्षक दिपक निंबाळकर पो.हवा अमोल जिंदे ना.पो.शि. रवि जुगनाके पो.शि. ओंम तल्लारी सह कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथे जावुन तेथील पोलिस स्टाफची मदत घेवुन तेथील कलकत्ता, हावडा, हुगली इत्यादी ठिकाणी अपघात करणा-या ट्रक व चालकाचा कसोसीने शोध घेतला.

सदर ट्रक क्रमाक WB-11-F-2177 व ट्रक चालक अरुणसिंह शत्रुधनसिंह वय 35 वर्ष रा. योगीयार पोस्ट सिधवल्ला जोईगर, गोपालगंज बिहार यास दिनांक 09/08/2024 रोजी डणकुनी पोलीस स्टेशन हद्दीतुन ताब्यात घेण्यात आले. अपघात करणारा ट्रक कंटेनर क्रमाक WB-11-F-2177 व ट्रक चालकास अटक करुन ट्रक कंटेनर जप्त करण्यात आले.तरी पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक.डॉ. सागर कवडे, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी, पुलगाव राहुल चव्हाण,पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे ठाणेदार पोलिस स्टेशन पुलगाव यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि दिपक निंबाळकर, पोलिस अंमलदार सुधिर लडके, चंद्रशेखर चुंटे, अमोल जिंदे, रितेश गुजर, रवि जुगनाके, ओमप्रकाश तल्लारी, विश्वजीत वानखेडे, उमेश बेले यांनी केली आहे.


