शुल्लक कारणावरुन झालेल्या खुन प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुलगाव (वर्धा ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २६/१०/२३ रोजी संध्याकाळी ६.३० वा. ते ६.४५ वा. चे दरम्यान या घटनेतील फिर्यादी व जखमी

रविकिरण मनोहरराव वानखेडे, वय ३८ वर्ष, रा. पळसगांव, ता. देवळी, जि. वर्धा





व सुर्दशन बाजारे, जगदीश बाजारे असे शेतातुन काम करुन घरी परत येत असतांना मौजा फत्तेपूर शेत शिवारात यातील आरोपी



प्रविण राजाभाऊ बाजारे, रा. पळसगांव, ता. देवळी, जि. वर्धा



याने जुने वादाचे कारणावरुन वाद करुन लाकडी झोडप्याने वरील तिन्ही जखमींना मारहाण करुन जखमी केले.सदर गुन्हयातील जखमी  सुदर्शन बापुरावजी बाजारे, वय ५१ वर्ष, रा. पळसगांव, ता. देवळी, जि. वर्धा हा उपचार घेत असताना दिनांक २८/१०/२३ रोजी मरण पावल्याने पोलिस स्टेशन पुलगाव येथे अप. क्रमांक ८६६/२०२३ कलम ३२६ भा.दं. वि. गुन्हयात कलम ३०२ भा.दं.वि. वाढ करण्यात आली होती आणि तेव्हापासुनच यातील
आरोपी प्रविण राजाभाऊ बाजारे, वय ४३ वर्ष, धंदा शेती रा. पळसगांव, ता. देवळी, जि. वर्धा हा  घटनेच्या तारखेपासुन आपली अटक चुकवित फरार झाला होता त्यासाठी पोलिस अधिक्षक यांचे आदेशावरुन पथक तयार करण्यात आले होते परंतु सदर आरोपीजवळ कुठलाही मोबाईल नसल्याने त्याला तांत्रिकद्रुष्ट्या शोधायला पोलिसांना अडचन येत होती त्यातच सदर आरोपी हा पुणे शिक्रापुर येथे नोकरी करत होता तेथूनच त्याने मालकाच्या मोबाईल वरुन आपले पत्नीस कॅाल केला पत्नीने त्यास परत येण्यास सांगितले त्यावरुन पोलिस पथक पुणे येथे रवाना झाले  व एक पथक पुलगाव व वर्धा येथील स्थानकावर नजर ठेऊन होते परंतु सदर आरोपी अहमदनगर येथे उतरला  त्यास  घेवुन पोलिस स्टेशन पुलगाव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार यांनी अहमदनगर येथील पूर्वी वर्धा जिल्ह्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांची मदत घेवुन सापळा रचुन मोठ्या शिताफिने सापळ्यात अडकवुन आरोपी प्रविण राजाभाऊ बाजारे, वय ४३ वर्ष, धंदा – शेती रा. पळसगांव, ता. देवळी, जि. वर्धा यास ताब्यात घेतले.
सदरची कार्यवाही  नूरुल हसन, पोलिस अधीक्षक, वर्धा,  डॉ. सागर कवडे, अपर पोलिस अधीक्षक,  संजय पवार, उप विभागीय पोलिस अधिकारी, पुलगांव यांचे मार्गदर्शनात, संजय गायकवाड,पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा,  दारासिंग राजपुत, पोलिस निरीक्षक, पो.स्टे. पुलगांव, पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, संतोष दरगुडे, सुधिर लडके, चंद्रकांत बुरंगे, विनोद रघाटाटे, निलेश कट्टोजवार, चंद्रशेखर चुटे, महादेव सानप, रविंद्र जुगनाके, अमोल जिंदे, विकास अवचट, राकेश आष्टनकर, उमेष बेले, पवन पन्नासे, हर्षल सोनटक्के, ओमप्रकाश तल्लारी यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!