रामनगर येथील गुन्हेगारास स्थानबध्दतेची कार्यवाही करुन पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची दशपुर्ती…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वर्धा – पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील हिंद नगर परीसरातील कुख्यात गुंड यश संजय श्रीवास्तव, वय २२ वर्ष, रा.गणेश मंदीर जवळ, हिंद नगर, वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर तसेच वर्धा (शहर) चे अभिलेखावर शरीराविरुध्द एकुण १३ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये दुखापत, गंभिर दुखापत, वाहनांची तोडफोड करुन जाळपोळ करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. सर्व गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ३ वर्षापासुन स्थानबद यश संजय श्रीवास्तव याने सिंदी (मेघे), हिंद नगर, थुल ले-आऊट, विक्रमशिला नगर, गौरक्षण वार्ड परीसरात अल्पावधीत जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. माहे फेब्रुवारी २०२३ मध्ये मध्यरात्रीचे सुमारास स्थानबध्दाने त्याच्या साथीदारांसह परीसरातील सहा वाहनांची तोडफोड करुन एका वाहनाची जाळपोळ सुध्दा केली होती. स्थानबध्द यश संजय श्रीवास्तव याच्या कृत्यांमुळे पोलिस स्टेशन रामनगर अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने याचेविरुध्द सन २०२० मध्ये तडीपार कार्यवाही सुध्दा करण्यात
आलेली होती. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने ठाणेदार रामनगर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक, वर्धा यांचे
मार्फतीने  मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना सादर केला होता. सदरहु स्थानबध्द गुंड प्रवृत्तीचा आणि सातत्याने करीत असलेल्या गुन्ह्यांची मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी गांर्भीयाने दखल घेवून यश संजय श्रीवास्तव, रा. हिंद नगर, वर्धा याचे विरुध्द दिनांक ०६.११.२०२३ रोजी स्थानबध्द आदेश जारी केल्याने त्यास
नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच भविष्यात वर्धा जिल्ह्यातील शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते, रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीचे लोकांविरुध्द उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे पुन:श्च संकेत मा. जिल्हाधिकारी, वर्धा व  पोलिस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत. सन २०२३ मध्ये अद्यापपावेतो एकुण ९ दारुविक्रते तसेच गुंडगिरी करणाऱ्या इसमावर कार्यवाही करुन कारागृहात स्थानबध्द करण्यात आलेले आहे. एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत वर्धा जिल्ह्याच्या अभिलेखावरील आजवर सर्वाधीक कार्यवाही करुन अशा गुन्हेगारांवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड स्था.गु.शा. वर्धा, पोलिस निरीक्षक महेश चव्हाण पो.स्टे. रामनगर, पोहवा. संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, अमोल आत्राम, स्था. गु.शा. वर्धा, पोनायक गजु इवनाथे, अरुण
धोटे यांचे डिबी पथकाने केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!