शेतात सुरु असलेल्या जुगारावर समुद्रपुर पोलिसांनी टाकला छापा,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..
गुन्हे प्रकटीकरण पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा,१० आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…
समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर वु्त्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस निरीक्षक स्थागुशा व सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने ,दिनांक १५/०१/२०२४ रोजी समुद्रपुर ठाणेदार संतोष शेगावकर यांना गोपनिय बातमी कळली की मौजा मुरदपुर शेतशिवारात जुगाराचा डाव रंगला आहे यावरुन संतोष शेगावकर यांनी त्यांचे अधिनस्त असलेले पोलिस कर्मचारी सफौ विक्की मस्के,नापोशि प्रमोद थुल ,समीर शेख,राजेश शेंडे यांचे सह स्वतः ठाणेदार यांनी घटनास्थळी जाऊन मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार जुगारावर छापा टाकला असता केला त्या ठिकाणी किमान १० ते १२ लोकं हे एकत्र बसुन खुल्याजागेमध्ये खाली बसुन बावन पत्याचा डावाबर पैसे लावुन जुगार खेळताना दिसुन आल्याने त्यांना त्याचेवर छापा टाकुन खाली नमुद
आरोपी-
1) श्रीकृष्णा बबनराव राउत वय 33 वर्ष रा. वार्ड क्र. 05 समुद्रपुर
2) पांडुरंग रामाजी फलके वय 41 वर्ष रा. धगडबन ता. समुद्रपूर
3) जंयत धनजय धोटे वय 43 वर्ष रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट
4) सुनिल विठ्ठलराव वरघणे वय 37 वर्ष रा. अल्लीपुर ता. हिगणघाट
5) श्रीकांत शरद ढोमणे वय 24 वर्ष रा. अल्लीपुर ता. हिंगणघाट
6) श्रीराम बबनराव राउत वय 38 वर्ष रा. वार्ड क्र 05 समुद्रपूर
7) शत्रुघ्न चंपतराव वलके वय 40 वर्ष रा. मुरादपूर ता. समु्द्रपूर
8) शैलेश प्रमोद घोडे वय 30 वर्ष रा. येरणवाडी, अल्लीपूर ता. हिंगणघाट
9) विनोद रमेशराव ढगे वय 27 वर्ष रा. अल्लीपूर ता. हिंगणघाट
10) पंकज विठ्ठलराव देवतारे वय 36 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिगंणघाट जि. वर्धा
यांना ताब्यात घेऊन त्यांचेजवळुन
1) डावावर लावलेले जुगाराचे 10,500/- रु.
2) अंगझडती मध्ये मिळुन आलेले 52,100/- रु.
3) एक मारुती सुजुकि 800 कार क्रमांक एम. एच. 31/ सी. आर. 0372 कि्. 3,00,000/- रु
3) मारोती सुझुकी 800 सिलव्हर रंगाची कार क्र. एम.एच 31 सि.आर,0372 किमत 3,000,00/- ,
4)एम.एच 32 ए.ए 8385 होन्डा ड्रीम युगा 110 मो.सा किंमत 70,000/-
5)होन्डा शाईन कंपंनिची मो.सा क्र एम.एच 32 .ए.डब्लु 0772 किमत 80,000/-
6)बजाज प्लसर 150 मो.सा एम.एच 32 ए.ए 3126 किंमत 90,000/-,
7)हिरो पँशन प्रो कंपमनिची मो.सा.क्र एम.एच 40 बि.एक्स 0170 किमत 70,000/-,
8)एक रियल मी कंपनिचा अँड्राईड मोबाईल किमत 10.000/-, 9)एक ओपो ए.57 कंपनिचा अँड्राईड मोबाईल किमत 8,000/-,
10) एक रियल मी कंपनिचा गुलाबी रंगाचे कव्हर असलेला अँड्राईड मोबाईल किंमत 10,000/-
11)एक विव्हो वाय 200 कंपनिचा अँड्राईड मोबाईल किं 9,000/- ,
12)एक लाव्हा कंपनिचा काळा रंगाचा साधा मोबाईल किंमत 2000/-,
13)एक जिओ भारत कंपनिचा निळा रंगाचा साधा मोबाईल किंमत 2000/-,
14) रेडमी कंपनिचा अँड्रीईड मोबाईल किमत 7000/-, 1
5)एक ओपो अँड्रॅाईड मोबाईल किमत 8,000/-
16) बावन ताश पते किमत 50/- रूपये असा जु.कीमत 7,28,850/- रू चा मद्देमाल मिळुन आला.
वरील सर्व मुद्देमाल जप्त करुन आरोपींसह पोलिस स्टेशन समुद्रपुर येथे शा. तर्फे लेखी फिर्याद देऊन अपराध क्र. 29/2024, कलम 12 (अ) म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरु आहे