गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला कारने अवैध गावठी दारुचा साठा….
अवैध गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्यास चारचाकी वाहनासह केली अटक,.हिंगणघाट पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कानगिरी….
हिंगणघाट(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे प्रकटीकरण पथक १ चे कर्मचारी हे सकाळी 10.00 वाजता दरम्यान पोलिस स्टेशनला हजर असताना बातमी दारांच्या माहितीवरून माहिती मिळाली की, नांदगाव झोपडपट्टी हिंगणघाट येथे दोन इसम एका लाल रंगाच्या चार चाकी वाहनामध्ये अवैधरीत्या गावठी मोहा दारूची वाहतूक करीत आहे अशा बातमीदाराच्या खात्रीशीर बातमीवरुन सांगीतलेल्या ठिकाणी जाऊन तात्काळ नाकाबंदी करुन नांदगाव ते बोरगाव सिमेंट रोडवर एक लाल रंगाची i10 गाडी क्र. Mh 40 kr 0165 येताना दिसताच तिला थांबवुन तिची तपासनी केली असता त्यामधे दोन प्लास्टिक कॅन मधे प्रत्येकी ५० लिटर व ब्लॅडर असा अवैधरीत्या गावठी मोहा दारू भरून वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपी नामे
सुनील इंद्रपाल काळे राहणार कुटकी तालुका हिंगणघाट
किरण नरेश काळे राहणार कुटकी तालुका हिंगणघाट
यांचे ताब्यातून एक लाल रंगाची i10 गाडी क्र. Mh 40 kr 0165 व 160 लिटर गावठी मोहा दारूसह 1,26,000/- रू चा माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक डॅा सागर कवडे यांचा मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित,पोलिस निरीक्षक मारुती मुळूक सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल आळंदे यांचा आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पो.हवा. सुमेध आगलावे,अजहर खान?नापोशि राहुल साठे,पोशि आशिष नेवारे अमोल तिजारे यांनी केली..