पोलिस अधिक्षक वर्धा श्री नूरुल हसन हे ठरणार गुन्हेगारांचे कर्दनकाळ,अजुन एका टोळीच्या तडीपारीचे दिलेत आदेश,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हीच परिस्थिती…
वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने पोलिस अधीक्षक, नूरुल हसन यांनी वर्धा शहरातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याच्या सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवीणे, टोळीनीशी गृहअतिक्रमण करुन जबर दुखापत करणे, जिवाणे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, टोळी विरुध्द मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्या बाबात आदेशीत केले होते.
त्यानुसार पोलिस स्टेशन रामनगर ठाणेदार यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरुन पोलिस अधिक्षक यांचे आदेशान्वये खालील नमुद टोळीतील सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्हातुन तडीपार केले आहे.
१) तुषार प्रभाकर बादलमवार वय २६ वर्ष रा. तुकाराम वार्ड रामनगर वर्धा
२) रेहाश ऊर्फ सुरेश संतोष राजपुत वय २६ वर्ष रा. शांतीनगर सिंधी मेघे वर्धा
३) सौरभ प्रकाश गावंडे वय २२ वर्ष रा. भाईमारे लेआउट वर्धा
४) सुरज संतोष राजपुत वय २७ वर्ष रा. शांतीनगर सिंधी मेघे वर्धा
५) विशाल रमेशराव बादलमवार वय २८ वर्ष रा. भाईमारे लेआट सिंधी मेघे वर्धा
सदर आदेश तामीली करीता पोलिस स्टेशन रामनगर येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर तडीपार
गुन्हेगारांचे शोध संबंधाने युध्द स्तरावर मोहीम राबवुन त्यांचा शोध घेवुन अंमलबजावणी करण्यात आली असुन त्यांना वर्धा जिल्हयातुन घालवुन देण्यात आले आहे. सन २०२३ मध्ये कलम ५५ म. पो. का. अन्वये एकुण दोन टोळयामधील ०८ गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्हयातुन तडीपार केले आहे.
सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक,. नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक, डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पो. नि. संजय गायकवाड, स्था. गु. शा. वर्धा, पो. नि. महेश चव्हाण
पोलीस स्टेशन रामनगर, पो. उप. नि. ओमप्रकाश नागापुरे, पो. शी दिनेश करलुके स्था. गु. शा. वर्धा, यांनी केली.